या 5 कारणांमुळे Jio 5G ठरेल खास; जाणून घ्या लाँच डेट, प्लॅन्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती

Jio Phone 5G Specifications Exclusive 5000mAh Battery 13MP Camera Know More Details

Jio 5G ची घोषणा स्वतः मुकेश अंबानींनी केली आहे. कंपनी दिवाळीत आपली 5G Service सुरु करणार आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीयांना 5G Network तसेच सुपर फास्ट 5G Internet मिळेल. 5G in India ची सुरुवात Reliance Jio पासून होणार आहे तसेच रिलायन्स जियोची Jio True 5G अनेक बाबतीत खास ठरणार आहे. देशात 5जी सर्व्हिस सुरु होण्याचा क्षण नक्कीच ऐतिहासिक असेल. पुढे आम्ही Jio 5G ची 5 असे मुद्दे सांगितले आहेत, ज्यामुळे ही सर्व्हीस भारतीयांसाठी खास ठरू शकते.

Jio True 5G चे 5 पॉईंट्स

  • कधी लाँच होणार Jio 5G Network
  • किती फास्ट असेल Jio 5G Internet
  • किती स्वस्त असतील Jio 5G Plans
  • कशी असेल Jio 5G Coverage
  • कोणती टेक्नॉलॉजी वापरेल Jio 5G

कधी लाँच होणार Jio 5G

जियो 5जीची घोषणा करताना मुकेश अंबानींनी स्पष्ट सांगितलं होतं की यंदा दिवाळीत देशात Jio 5G Network सुरु होईल. जियो 5जी सर्व्हिस सर्वप्रथम भारतातील प्रमुख शहरं व महानगरांमध्ये दिली जाईल, ज्यात मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईचा समावेश असेल. त्यानंतर 18 महिन्यांच्या आत Jio 5G संपूर्ण देशात पसरेल तसेच डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतात जियो 5जी नेटवर्कचं जाळं पसरेल. जियोचं 5जी नेटवर्क देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका व गावापर्यंत पोहोचेल आणि जगातील सर्वात मोठं नेटवर्क असेल.

Jio 5G Internet Speed

जियो 5जीला मुकेश अंबानींनी Jio True 5G असं नाव दिलं आहे. 5जी लाँचच्या घोषणेदरम्यान कंपनीनं सांगितलं आहे की त्यांनी जियो 5जी ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत तसेच जियो 5जी नेटवर्कवर त्यांना 1 Gbps पेक्षा जास्त स्पीड मिळाला आहे. जियोच्या मते त्यांच्या 5जी नेटवर्कवर हाय क्वॉलिटी ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग मिळेल तसेच मोबाइल युजर्सना 4G पेक्षा चांगला व्हिडीओ कॉलिंग एक्सपीरियंस मिळेल. Jio 5G Internet मध्ये अल्ट्रा-लो लेटेंसी सर्व्हिस दिली जाईल.

स्वस्त असेल Jio 5G

भारतात 5जी येण्याआधी अंदाज लावला जात आहे की टेलीकॉम कंपन्या आपल्या 5जी सर्व्हिससाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतील. इंटरनेटवर याबाबत चर्चाना उधाण आलं होतं की 5जी प्रीमियम सर्व्हिस असेल ज्यात 5G Recharge Plans महागडे असतील तसेच 5G Data Price देखील खूप जास्त असेल. परंतु मुकेश अंबानींनी जियो 5जी लाँच करताना दावा केला आहे की त्यांच्या कंपनीचं 5जी नेटवर्क महाग असणार नाही तसेच कंपनी आपल्या 5G Plans ची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्यात ठेवेल.

Jio 5G Coverage

रिलायन्स जियो आपली 5जी सर्व्हिस SA म्हणजे स्टॅन्ड अलोन टेक्नॉलॉजीवर सादर करेल. SA 5G मुळे जियोचं 5जी नेटवर्क उत्तम क्वॉलिटीसह शानदार कव्हरेज देईल. ड्युअल मोड 5जी म्हणजे SA/NSA 5G च्या तुलनेत फक्त SA 5G यूज केल्यावर नेटवर्क कपॅसिटी अनेक पटीनं वाढते. तसेच जियो Mid Band 5G Spectrum चा वापर करणार आहे, दोन्ही मिळून नेटवर्क व कव्हरेज जबरदस्त बूस्ट होईल.

Made in India असेल Jio 5G

रिलायन्स जियोची 5जी सर्व्हिस तसेच 5जी टेक्नॉलॉजी पूर्णपणे मेड इन इंडिया असेल. देशातील कानाकोपऱ्यात शानदार कव्हरेज व इंटरनेट पोहोचवण्यासाठी Reliance Jio नं Meta (Facebook), Google, Microsoft, Intel, Ericsson, Nokia, Samsung, Cisco आणि Qualcomm सारख्या दिग्गज कंपन्यांशी भागेदारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here