BGMI Unban In India: ‘जय पबजी!’ चा नारा पुन्हा घुमणार; BGMI फॅन्ससाठी आली खुशखबर

bgmi

लोकप्रिय मोबाइल गेम Battlegrounds Mobile India (BGMI) चे प्लेयर्स लवकरच हा गेम पुन्हा खेळू शकतील. कंपनी लवकरच आपल्या सर्वरची लोकेशन इंडिया-सिंगापूरवरून इंडिया-मलेशिया करू शकते. Insidesport च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की अनेक प्लेयर्सचे आयडी इन-गेम सर्च रिजल्टमध्ये दिसत नाहीत. परंतु हे आयडी रँकिंग टेबलवर दिसत आहेत. त्याचबरोबर युजर्सना मायग्रेशन नोटिस देखील मिळत आहे, ज्यात लिहिण्यात आलं आहे की आज ज्या प्लेयरची आयडी दिसत आहे त्यांना Battlegrounds Mobile India वर मायग्रेट केलं जात आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की डेटा ट्रांसफर प्रॉम्प्ट, PUBG मोबाइल-BGMI डेटा ट्रांसफर दरम्यान दिसत होता तसा आहे.

BGMI नं मात्र याबाबत कोणतंही अधिकुर्ट विधान केलं नाही. जर डेटा ट्रांसफरचा रिपोर्ट खरा ठरला तर याचा अर्थ असा की भारत सरकारद्वारे BGMI वरील लवकरच हटवली जाऊ शकते. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की या बातमीमुळे मोठ्या प्रमाणात बंदी हटवण्याची तारीख समोर येत आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की या सर्व बातम्यांना तेव्हा वेग आला जेव्हा अनेक फॅन्सना बीजीएमआयमध्ये काही विशेष प्लेयर्सची आयडी शोधताना ‘अकाऊंट मायग्रेशन‘ चा सामना करावा लागला. हे देखील वाचा: रंग बदलणारी महागडी टेक्नॉलॉजी बजेटमध्ये; 13GB RAM, 64MP Camera असलेल्या फोनची लाँच डेट समजली

bgmi

BGMI का झालं बॅन

गुगल आणि अ‍ॅप्पलनं भारत सरकारकडून मिलेल्या आदेशांमुळे 28 जुलाई, 2022 ला क्राफ्टनचा बॅटल रोयाल गेम आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवला होता. सरकारनं देशाची सुरक्षा आणि डेटा शेयरिंगची चिंता व्यक्त करत चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी आयटी कायद्या अंतर्गत BGMI वर बंदी घातली होती. भारत सरकारनं 2020 पासून आतापर्यंत 100 पेक्षा जास्त चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, ज्यात टेनसेंट गेम्सच्या प्लेयर अननोन बॅटलग्राउंड (PUBG) चा देखील समावेश आहे.

bgmi

PUBG आणि Free Fire बॅन

BGMI टेनसेंटच्या पॉपुलर गेम PlayerUnknown’s Battlegrounds (PUBG) चा इंडिया व्हेरिएंट आहे. भारत सरकारनं पबजीवर आधीच बंदी घातली आहे. पबजी बॅन झाल्यानंतर क्राफ्टननं हा गेम भारतात BGMI नावानं लाँच केला होता. लाँच होताच BGMI इंडियन फॅन्समध्ये खूप लोकप्रिय झाला होता. त्याचप्रमाणे Garena नं फ्री फायर बॅन झाल्यावर Garena Free Fire Max लाँच केला आहे. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली वनप्लस येतोय; शाओमी-सॅमसंगचं टेन्शन वाढवणार का OnePlus 11 Pro 5G?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here