सर्वात शक्तिशाली वनप्लस येतोय; शाओमी-सॅमसंगचं टेन्शन वाढवणार का OnePlus 11 Pro 5G?

OnePlus नं सध्या जरी बजेट आणि मिड रेंजमध्ये आपलं स्थान निर्माण केलं असलं तरी कंपनीनं फ्लॅगशिप स्मार्टफोन्सकडे दुर्लक्ष केलं नाही. यंदा कंपनीनं क्वॉलकॉमच्या हायएंड चिपसेटसह OnePlus 10 Pro, OnePlus 10T सारखे जबरदस्त स्मार्टफोन सादर केले आहेत. आता लोकप्रिय टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशननं माहिती दिली आहे की वनप्लस एका नव्या फ्लॅगशिप फोनवर काम करत आहे, जो Snapdragon 8 Gen 2 SoC चिपसेटसह बाजारात येईल. हा क्वॉलकॉमचा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर असू शकतो.

तसेच SmartPrix आणि Steve Hemmerstoffer यांनी मिळून आगामी OnePlus 11 Pro चे रेंडर्स देखील शेयर केले आहेत. OnePlus 11 Pro ची लाँच डेट समजली नसली तरी हा फ्लॅगशिप स्मार्टफोन पुढच्यावर्षी म्हणजे 2023 च्या सुरुवातीला बाजारात येऊ शकतो. OnePlus 11 Pro च्या लेटेस्ट रेंडर्समधून समजलं आहे की कॅमेरा मोड्यूल रीडिजाइन करण्यात येईल परंतु Hasselblad चं ब्रॅंडिंग तसंच ठेवण्यात येईल. तसेच OnePlus 10 सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये गायब झालेला आयकॉनिक अलर्ट स्लायडर पुन्हा येईल, असं दिसत आहे. हे देखील वाचा: रंग बदलणारी महागडी टेक्नॉलॉजी बजेटमध्ये; 13GB RAM, 64MP Camera असलेल्या फोनची लाँच डेट समजली

OnePlus 11 Pro ची डिजाइन रेंडर्समधून लीक

या पहिल्या रेंडर्समधून OnePlus 11 Pro च्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. परंतु ही अंतिम डिजाइन असेलच असं नाही, पुढील काही महिन्यांमध्ये यात बदल देखील होऊ शकतात. डिजाइन पाहता फोनच्या फ्रंटला वरच्या बाजूला डावीकडे एक पंच होल कट आऊट दिसत आहे ज्यात सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. या फोनचा डिस्प्ले नॅरो बेझल्ससह सादर करण्यात येईल. हे देखील वाचा: 6GB RAM आणि 50MP Camera असलेला Vivo Y22 भारतात लाँच; किंमत फक्त 14499 रुपये

फोनमध्ये हलके कर्व एज दोन्ही बाजूनं मिळेल. फोनच्या उजव्या पॅनलवर अलर्ट स्लायडर आणि पावर बटन देण्यात येईल, तर डावीकडे व्हॅल्यूम रोकर्स मिळतील. स्पीकर ग्रिल्स आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट फोनच्या तळाला मिळेल. बॅक पॅनल लक्ष वेधून घेणारं आहे. आगामी वनप्लसमध्ये वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल मिळेल, ज्यात ट्रिपल कॅमेरा सेन्सर्स आणि एलईडी फ्लॅश देण्यात येईल. हा फोन ब्लॅक कलरमध्ये दिसत आहे, परंतु लाँचच्या वेळी इतर अनेक ऑप्शन सादर केले जाऊ शकतात. OnePlus चा लोगो बॅक पॅनलच्या मध्यभागी देण्यात येईल.

OnePlus 11 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11 Pro चे स्पेसिफिकेशन्स मात्र अजूनही गुलदस्त्यात आहेत. सध्या फक्त हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह बाजारात येईल, असं म्हणता येईल. हा चिपसेट अजूनपर्यंत लाँच झालेला नाही. परंतु टिपस्टरनुसार या प्रोसेसरसह वनप्लस आपल्या आगामी स्मार्टफोनवर काम करत आहे. हा नवीन चिपसेट नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या Snapdragon Tech Summit मध्ये ऑफिशियली लाँच केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here