सरकारी कंपनी बीएसएनएल खाजगी टेलिकॉम कंपन्यांना चांगली टक्कर देत आहे. प्रायव्हेट कंपन्यांच्या महागड्या रिचार्ज प्लॅन्सना कंटाळून ग्राहक देखील सरकारी कंपनीकडे वळत आहेत. त्यामुळे BSNL 5G साठी जरी बराच वेळ वाट बघावी लागणार आहे परंतु जर तुम्ही बीएसएनएल युजर्स असाल तर कंपनीकडे स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची एक मोठी यादी आहे. या रिचार्ज प्लॅन्सची किंमत आणि मिळणारे बेनिफिट्स पाहता, Jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांना देखील हे टक्कर देतील. म्हणूनच या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला बीएसएनलच्या अशा प्लॅनबाबत माहिती देणार आहोत, ज्याची किंमत 100 रुपयांच्या आसपास आहे, परंतु, यात 50 दिवसांच्या वॅलिडिटीसह डेटा आणि कॉलिंगचा लाभ मिळतो. चला जाणून घेऊया या प्लॅन बाबत…
BSNL चा 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
प्लॅनची किंमत 107 रुपये आहे. हा प्लॅन त्या लोकांसाठी जास्त उपयुक्त आहे जे कमी किंमतीत आपला नंबर सुरु ठेवू इच्छित आहेत. वर सांगितल्याप्रमाणे रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 50 दिवसांची वॅलिडिटी दिली जाते. तसेच 50 दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून्सची सुविधा देखील मोफत मिळते.
3GB डेटा आणि कॉलिंग फ्री
50 दिवसांची वैधता व्यतिरिक्त प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्स देखील मिटला. प्लॅनमध्ये इंटरनेटसाठी यात 3GB डेटा मिळतो. व्हॅलिडिटी पूर्ण होईपर्यंत हा डेटा हवा त्याप्रमाणे वापरता येतो. तसेच कॉलिंगसाठी यात 200 मिनिट्स मिळतात. या प्लॅनमध्ये कोणत्या प्रकारचे SMS बेनिफिट्स मिळत नाहीत.
BSNL 4G Services
5G in India चं लवकरच सत्यात येणार आहे. एकीकडे Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या 5G Services लाँच करण्याची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलला अजूनही संपूर्ण देशात आपलं 4G Network देखील सुरु करता आलं नाही. संसाधनांच्या अभावात असलेल्या बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी काल केंद्रीय कॅबिनेटनं अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार BSNL ला मोठी आर्थिक मदार दिली जाईल, तसेच कंपनी देशात नवीन मोबाईल टॉवर उभारून दुर्गम भागात आपली 4G Services सुरु करेल.
संपूर्ण भारतात BSNL 4G Services देण्यासाठी केंद्र सरकारनं कंपनीला खूप मोठं पॅकेज देखील दिलं आहे. 4G सर्व्हिससाठी आवश्यक उपकरणं लावण्यासाठी आणि टेक्नॉलॉजीी अपग्रेड करण्यासाठी सरकारकडून बीएसएनएलला 26 हजार कोटी रुपयांची रक्कम दिली जाईल. तसेच दुर्गम भागांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये व्हायरलाइन सर्व्हिस देण्याचे प्रकल्प देखील हातात घेतले जातील यासाठी बीएसएनएलला 13,789 कोटी रुपये इक्विटी म्हणून देण्यात येतील. केंद्राकडून मिळालेल्या या मुदतीनंतर बीएसएनएलचा इक्विटी बेस 40,000 कोटींवरून 1,50,000 कोटी होईल.
















