Samsung Galaxy Book3 लॅपटॉप सीरीज भारतात लाँच; इतकी आहे किंमत

Highlights

  • Samsung Galaxy Book3 सीरीजच्या भारतातील किंमतींची घोषणा.
  • सॅमसंगच्या या प्रीमियम लॅपटॉप सीरीजमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स मिळतात.
  • या सीरीजमध्ये Galaxy Book3 Pro, Galaxy Book3 Pro 360 आणि Galaxy Book3 Ultra मॉडेल आहेत.

Galaxy Unpacked Event 2023 च्या माध्यमातून Samsung फक्त स्मार्टफोन सादर केले नाहीत तर कंपनीनं एक प्रीमियम लॅपटॉप सीरीज देखील लाँच केली आहे. Samung Galaxy Book3 सीरीजमध्ये Galaxy Book3 Pro, Galaxy Book3 Pro 360 आणि Galaxy Book3 Ultra असे तीन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. ज्यात AMOLED डिस्प्ले, HD कॅमेरा, 13th Gen प्रोसेसर आणि Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम सारखे फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया यांची भारतातील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy Book3 Series ची भारतातील किंमत

  • Galaxy Book3 Pro (Intel Core i5) 14 इंच, 16GB/512GB: 1,31,990 रुपये
  • Galaxy Book3 Pro (Intel Core i7) 14 इंच, 16GB/512GB: 1,39,990 रुपये
  • Galaxy Book3 Pro (Intel Core i7) 14 इंच, 16GB/1TB: 1,55,990 रुपये
  • Galaxy Book3 Pro (Intel Core i7) 16 इंच, 16GB/512GB: 1,49,990 रुपये
  • Galaxy Book3 Pro (Intel Core i7) 16 इंच, 16GB/1TB: 1,65,990 रुपये
  • Galaxy Book3 Pro 360 (Intel Core i5) 16 इंच, 16GB RAM/512GB: 1,55,990
  • Galaxy Book3 Pro 360 (Intel Core i7) 16 इंच, 16GB/512GB: 1,63,990 रुपये
  • Galaxy Book3 Pro 360 (Intel Core i7) 16 इंच, 16GB/1TB: 1,79,990 रुपये
  • Galaxy Book3 Pro Ultra (Intel Core i7) 16 इंच, 32GB/1TB: 2,81,990 रुपये

Samsung Galaxy Book3 Pro आणि Book3 Pro 360 चे स्पेसिफिकेशन्स

Galaxy Book3 Pro 14 इंच आणि 16 इंचाच्या दोन स्क्रीन साइजमध्ये आला आहे. तर Galaxy Book3 Pro 360 ची स्क्रीन साइज 16 इंच आहे. दोन्ही लॅपटॉप मध्ये 3K रिजोल्यूशन (2880 x 1800) असलेला डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 500 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हे Intel 13th Gen Core i5 आणि Core i7 प्रोसेसरसह येतात, जोडीला Intel Iris Xe ग्राफिक्स कार्ड मिळेल. दोन्ही लॅपटॉप Beige आणि Graphite कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येतील. हे देखील वाचा: 8 फेब्रुवारीला लाँच होणार Moto E13 स्मार्टफोन, 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल किंमत

यात 8GB/16GB/32GB LPDDR5 सह 256GB/512GB/1TB SSD स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. यात Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी एक HDMI 1.4 पोर्ट, दोन UBS Type C Thunderbotl 4 पोर्ट, एक USB 3.2 Type A पोर्ट, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, 3.5mm ऑडियो जॅक मिळतो. दोन्ही लॅपटॉप 65W USB Type C चार्जिंगला सपोर्ट करतात. तसेच FHD1080p वेब कॅमेरा देण्यात आला आहे.

दोन्ही लॅपटॉप 5G नेटवर्कला देखील सपोर्ट करतात. Galaxy Book3 Pro च्या 14 इंचाच्या मॉडेलमध्ये 63Wh ची बॅटरी मिळते. तर Galaxy Book3 Pro 360 च्या 16 इंचाच्या मॉडेलमध्ये 76Wh ची बॅटरी आहे. Book3 Pro 360 S-Pen ला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Book3 Ultra चे स्पेसिफिकेशन

सॅमसंगचा हा प्रीमियम लॅपटॉप 16 इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्लेसह येतो, ज्याचे रिजोल्यूशन 3K (2880 x 1800) आहे. हा लॅपटॉप दोन प्रोसेसर 13th Gen Intel Core i7 आणि Core i7 सह येतो. यात ग्राफिक्ससाठी NVIDIA GeForce RTX 4050 आणि GeForce RTX 4070 देण्यात आला आहे. यात 16GB/32GB LPDDR5 RAM चा सपोर्ट मिळेल. त्याचबरोबर, स्टोरेजसाठी 512GB/1TB SSD देण्यात आली आहे. हा लॅपटॉप 76Wh ची बॅटरी आणि 100W USB Type C चार्जिंगला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज; Vivo Y100 ची होणार भारतात जबरदस्त एंट्री

सॅमसंगच्या या प्रीमियम लॅपटॉपचा एकच Graphite कलर उपलब्ध होईल. यात कनेक्टिव्हिटीसाठी एक HDMI 1.4 पोर्ट, दोन UBS Type C Thunderbotl 4 पोर्ट, एक USB 3.2 Type A पोर्ट, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आले आहेत. हा लॅपटॉप पण Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि यात FHD रिजोल्यूशन असलेला कॅमेरा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here