कंपनीनं टीज केला Vivo Y100; लवकरच येऊ शकतो भारतात

Highlights

  • Vivo Y100 स्मार्टफोन रोज गोल्ड आणि ब्लु कलरमध्ये येईल.
  • Vivo Y100 ची भारतातील किंमत 27,000 रुपयांच्या आसपास असेल.
  • फोनमध्ये 64MP कॅमेरा, अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि Dimensity 900 चिपसेट मिळण्याची शक्यता.

Vivo सध्या आपल्या लोकप्रिय वाय सीरिजमध्ये नवा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे, जो भारतीय बाजारात Vivo Y100 नावानं दाखल केला जाईल. हा डिवाइस अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे, त्यामुळे याच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे आता कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून Vivo Y100 चा लाँच टीज केला आहे.

विवोनं प्रकाशित केलेल्या टीजरनुसार, Vivo Y100 स्मार्टफोन रोज गोल्ड आणि ब्लु अशा दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. बॉलिवूडची अभिनेत्री सारा अली खान Vivo Y100 ची ब्रँड अँबॅसेडर असेल. लाँचपूर्वी कंपनीनं आपल्या वेबसाइटवर या फोनसाठी एक मायक्रो साईट देखील बनवली आहे ज्यावर ‘नोटिफाय मी’ बटन देण्यात आलं आहे, त्यामुळे या स्मार्टफोनच्या लाँचची पुष्टी झाली आहे. हे देखील वाचा: 100MP कॅमेऱ्यासह Oppo Reno 8T आणि Reno 8T 5G ची एंट्री; शाओमी-रेडमीच्या अडचणीत वाढ

Vivo Y100 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 64MP Rear Camera
  • HDR10+ AMOLED display
  • MediaTek Dimensity 900
  • 6GB RAM + 128GB storage

विवो वाय100 संबंधित माहितीनुसार हा मोबाइल फोन अ‍ॅमोलेड पॅनल डिस्प्लेसहवर लाँच केला जाईल. या फोनची स्क्रीन एचडीआर10+ला सपोर्ट करेल तसेच यात 1300निट्स ब्राइटनेस मिळेल. स्क्रीन साईज व स्टाईल कशी असेल याची सविस्तर माहिती मिळाली नाही परंतु यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता जास्त आहे.

Vivo Y35 5G

Vivo Y100 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 900 प्रोसेसरसह लाँच केला जाईल. हा विवो फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे. फोन किती 5G Bandsना सपोर्ट करेल हे मात्र समोर आलं आहे. तसेच ग्राफिक्ससाठी या विवो मोबाइलमध्ये एआरएम माली-जी68 एमपी4 जीपीयू मिळेल जो 900मेगाहर्ट्ज वर काम करेल.

विवो वाय100 स्मार्टफोन भारतीय बाजारात 6जीबी रॅमसह एंट्री करेल, जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. आशा आहे की फोनचे अन्य मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येतील. तसेच फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येईल. हे देखील वाचा: 8 फेब्रुवारीला लाँच होणार Moto E13 स्मार्टफोन, 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल किंमत

Vivo Y100 ची संभाव्य किंमत

मिळालेल्या माहितीनुसार विवो वाय100 इंडिया प्राइस 27,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ही फोनच्या मोठ्या मेमरी व्हेरिएंटची किंमत असू शकते, त्यामुळे स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत यापेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. एवढं मात्र नक्की समजलं आहे की Vivo Y100 एक मिडबजेट स्मार्टफोन म्हणून भारतीय बाजारात एंट्री करेल आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात देशात सेलसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here