456KM सह लाँच झाली Mahindra XUV400 EV; इतकी आहे किंमत

Highlights

  • Mahindra XUV400 EV दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.
  • एक्सयूवी 400 इलेक्ट्रिकची किंमत 15.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु
  • ईव्हीची बुकिंग कंपनीच्या साइटवर 26 जानेवारी पासून सुरु होईल.

महिंद्रानं देशात आपली पहिली इलेक्ट्रिक कार Mahindra XUV400 EV लाँच केली आहे. Mahindra ची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही अनेक शानदार फीचर्स आणि 456KM रेंजसह बाजारात आली आहे. तसेच, कंपनीनं हिची किंमत आणि बुकिंग डिटेलचा देखील खुलासा केला आहे. ही ई-कार भारतातील Tata Nexo Ev Max ला टक्कर देईल. चला जाणून घेऊया या स्वदेशी ईव्ही बाबत सर्वकाही.

Mahindra XUV 400 EV Price

XUV 400 EV दोन बॅटरी साइज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. या ई-कारच्या 34.5 kwh बॅटरी साइज च्या 3.3 kw व्हर्जनची किंमत 15.99 लाख रुपये (Ex-Showroom) आहे, सोबत 7.2 किलोवॉट चार्जर घेतल्यास या व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत 16.49 लाख रुपये होईल. या इलेक्ट्रिक कारच्या टॉप व्हेरिएंट ईएलची एक्स शोरुम किंमत 18.99 लाख रुपये आहे. कंपनीनुसार दोन्ही व्हेरिएंटच्या पहिल्या पाच हजार बुकिंग्सवरच ही किंमत लागू असेल. कारची बुकिंग 26 जानेवारी पासून सुरु होईल. हे देखील वाचा: जबरदस्त! इलेक्ट्रिक अवतारातील Honda Activa लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात

456 किलोमीटर मिळेल रेंज

कंपनीचा दावा आहे की एक्सयूवी 400 इलेक्ट्रिक सिंगल चार्जमध्ये 375 आणि 456 किलोमीटर पर्यंत चालवता येईल. यातील 34.5 किलोवॉटची बॅटरी 375 किलोमीटर आणि 39.4 किलोवॉटची बॅटरी 456 किलोमीटरची रेंज देईल. तसेच कंपनीनं दावा केला आहे की कारची बॅटरी आयपी-67 रेटिंगसह येते. ज्याचा अर्थ असा की ईव्हीची बॅटरी धूळ आणि माती सोबतच पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित राहू शकते. तसेच हिचा टॉप स्पीड 150KMPH आहे.

Mahindra XUV 400 चा लुक

ही कंपनीच्या सर्वात सेफेस्ट कार पैकी एक XUV300 प्रमाणे दिसते. या कारमध्ये महिंद्राचा नवीन लोगो देण्यात आला आहे. Mahindra XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही साइजच्या बाबतीत महिंद्रा XUV300 पेक्षा मोठी आहे त्यामुळे ही पूर्णपणे एक SUV आहे. या नवीन एसयूव्हीची लांबी 4.2 मीटर आहे. Mahindra XUV 400 सॅटिन कॉपर फिनिश मध्ये ड्युअल टोन रूफ ऑप्शनसह आर्कटिक ब्लू, एवरेस्ट व्हाइट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू अशा पाच कलर ऑप्शनमध्ये येते. हे देखील वाचा: ती पुन्हा आली! LML कंपनीनं सादर केली शानदार इलेक्ट्रिक स्कूटर Star

Mahindra XUV 400 चे फीचर्स

Mahindra XUV 400 EV चे फीचर्स पाहता यात इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर, एरोडायनॅमिक डिजाइन असेलेले 17-इंचाचे अलॉय व्हील, ड्युअल-जोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, रेन सेंसिंग वायपरसह ऑटो हेडलॅम्प, टाइप-सी चार्जिंग आउटलेट आणि अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here