छोटंसं काम करून मोफत मिळवा पारदर्शक लुक असलेला Nothing Phone 1; जाणून घ्या माहिती

एकसारख्या अँड्रॉइड स्मार्टफोन्सच्या गर्दीत ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नव्या Nothing ब्रँडनं हटके डिजाइनचा आधार घेतला होता. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनल आणि एलईडी लाइट्स असेलला Nothin Phone (1) सादर केला आहे. जो तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय स्मार्टफोन ठरला आहे. आता Nothing कंपनीचे CEO Carl Pei यांनी दोन Nothing Phone (1) मोफत देण्याची घोषणा केली आहे. Carl Pei यांनी ही घोषणा मायक्रोब्लागिंग साइट ट्विटरवरून केली आहे. चला जाणून घेऊया हा हटके डिजाइन असलेला फोन कशाप्रकारे मोफत मिळवता येईल.

असा मोफत मिळेल फोन

Nothing CEO Carl Pei नुसार ट्विटरवर जो युजर त्यांच्या पोस्टवर कमेंट करेल त्याला नथिंग फोन 1 मोफत मिळेल, परंतु त्या कमेंटवर लाइक असता कामा नये. त्यानंतर त्यांनी माहिती दिली आहे की सर्वाधिक अधिक लाइक असलेल्या कमेंटला देखील नवीन नथिंग फोन (1) मोफत दिला जाईल. नथिंग फोन (1) जिकंण्यास पात्र ठरण्यासाठी युजरला पेईच्या पोस्टला रिप्लाय करावा लागेल, तसेच कोणीही तुमच्या पोस्टला लाइक करणार नाही याची काळजी घ्यावी लागेल किंवा सर्वाधिक लाइक मिळतील अशी कमेंट करावी लागेल.

Nothing Phone (1) ची किंमत

Nothing Phone (1) स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत 27,499 रुपये आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 29,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला टॉप एन्ड मॉडेल 33,499 रुपयांमध्ये तुमचा होईल.

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here