एकच नंबर! रेडमी-रियलमीच्या अडचणी वाढल्या; 7 हजारांच्या बजेटमध्ये नवीन Lava फोन लाँच

India’s most affordable 5G smartphone (सर्वात स्वस्त 5जी फोन) Lava Blaze 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन असल्याचं सांगण्यात आलं आहे ज्याची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास आहे. आज या इंडियन मोबाइल कंपनी लावानं बाजारात आणखी एक स्वस्त मोबाइल फोन सादर केला आहे. कमी किंमत असलेला 4जी स्मार्टफोन Lava Yuva Pro भारतात लाँच झाला आहे ज्याच्या प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Lava Yuva Pro Price

लावा युवा प्रो भारतीय बाजारात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या मोबाइल फोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. लावा युवा प्रो प्राइस 7,799 रुपये आहे तसेच लावा मोबाइल Metallic Black, Metallic Blue आणि Metallic Grey कलरमध्ये विकत घेता येईल. या फोन सोबत 100 दिवसांची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट देखील मिळत आहे. हे देखील वाचा: ऐश्वर्या रॉय बच्चनचा Ponniyin Selvan (PS1) लवकरच होणार या OTT वर रिलीज, जाणून घ्या तारीख

3gb ram cheap phone lava yuva pro launched in india check price specifications

Lava Yuva Pro Specifications

लावा युवा प्रो 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.517 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. हा फोन 269पीपीआय तथा 16.7एम कलरला सपोर्ट करतो तथा कंपनीनं फोन डिस्प्लेला 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लासची सुरक्षा दिली आहे.

3gb ram cheap phone lava yuva pro launched in india check price specifications

Lava Yuva Pro अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो मीडियाटेक हीलियो चिपसेटवर चालतो. मात्र कंपनीनं चिपसेट कोडनेमचा खुलासा केला नाही, त्यामुळे फोनच्या प्रोसेसरची माहिती मात्र गुलदस्त्यात आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅम तसेच 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह 512 जीबी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील मिळतो.

3gb ram cheap phone lava yuva pro launched in india check price specifications

फोटोग्राफीसाठी लावा युवा प्रो ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जोडीला दोन एआय टेक्नॉलॉजी असलेले सेन्सर देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Lava Yuva Pro स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Jio 5G Welcome Offer: मोफत वापरायचं आहे का 5G? अशाप्रकारे करा इन्व्हाईटसाठी अप्लाय

3gb ram cheap phone lava yuva pro launched in india check price specifications

Lava Yuva Pro एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 10वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की हा फोन 13 तासांपेक्षा जास्त स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here