BSNL आपल्या किफायतशीर प्लॅन्सच्या जीवावर प्रायव्हेट कंपन्यांना टक्कर देत आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या 90 दिवसांच्या एका प्लॅनबाबत माहिती देणार आहोत. हा प्लॅन त्या ग्राहकांसाठी अतिशय योग्य आहे, ज्यांना डेटाच्या तुलनेत जास्त व्हॉइस कॉलिंग हवी असते. चला जाणून घेऊया ह्या प्लॅनची संपूर्ण माहिती.
बीएसएनएल 439 रुपयांचा प्लॅनची माहिती
- बीएसएनएलच्या ह्या 439 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते.
- ह्यात 90 दिवस रोज लोकल एसटीडी कॉलिंगचा आनंद घेता येईल.
- कॉलिंग व्यतिरिक्त ह्या पॅकमध्ये 300 फ्री SMS देखील दिले जात आहेत.
- कॉलिंग आणि एसएमएसव्यतिरिक्त ह्या प्लॅनमध्ये इतर कोणतेही बेनिफिट्स मिळत नाहीत.
नोट : जर तुमच्या घरी वाय-फाय कनेक्टिव्हिटी असेल आणि तुम्हाला फक्त नंबर चालू ठेवणे आणि कॉलिंगसाठी स्वस्त प्लॅन हवा असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
जियो-एयरटेल कडे देखील आहेत 90 दिवसाचे प्लॅन
Jio चा 899 रुपयांचा प्लॅन : रिचार्जमध्ये 90 दिवसांच्या वैधतेसह डेली 2.5जीबी डेटा म्हणजे एकूण 225जीबी डेटा मिळेल. तसेच , रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS फ्री मिळतील. त्याचबरोबर जियो अॅप्सचं सब्सस्क्रिप्शन देखील ग्राहकांना मोफत दिलं जाईल.
एयरटेलचा 779 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 1.5GB डेली डेटा, 100 SMS/ day, विंक म्यूजिक सब्सक्रिप्शन, फ्री हॅलो ट्यून्स, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक आणि Apollo 24/7 Circle सब्सक्रिप्शन मिळतं. तसेच, रिचार्जची वैधता 90 दिवस आहे.