32MP Selfie कॅमेरा आणि 144Hz pOLED स्क्रीनवर लाँच झाला नवीन Motorola Edge 2024 स्मार्टफोन

मोटोरोलाने जागतिक मार्केटमध्ये आपल्या ‘ऐज’ सीरिजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन Motorola Edge (2024) सादर केला आहे. हा मोबाईल अमेरिकन मार्केटमध्ये लाँच झाला आहे जो Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरवर चालतो. यात 32MP Selfie Camera, 68W चार्जिंग तसेच 144Hz pOLED डिस्प्ले सारखे स्पेसिफिकेशन पण मिळतात. मोटोरोला ऐज 2024 ची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Motorola Edge 2024 किंमत

नवीन मोटोरोला ऐज 2024 स्मार्टफोन 8GB RAM वर लाँच झाला आहे जो 256GB Storage ला सपोर्ट करतो. हा फोन यूएस मार्केटमध्ये $549.99 डॉलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. ही किंमत भारतीय चलनानुसार 45,890 रुपयांच्या आसपास आहे. हा मोबाईल भारतीय बाजारात येईल की नाही अजून सांगितले जावू शकत नाही.

Motorola Edge 2024 फोटो

Motorola Edge 2024 स्पेसिफिकेशन

  • 6.6″ 144 हर्ट्झ पीओएलईडी स्क्रीन
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2
  • 50 एमपी + 13 एमपी बॅक कॅमेरा
  • 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
  • 68 वॉट टर्बोपावर चार्जिंग
  • 5,000 एमएएच बॅटरी

डिस्प्ले : मोटोरोला ऐज 2024 स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.6 इंचाच्या FHD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन pOLED पॅनलवर बनली आहे जो 144Hz रिफ्रेश रेट आहे तसेच 1300nits ब्राईटनेसला सपोर्ट करते.

प्रोसेसर : Motorola Edge 2024 अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Qualcomm Snapdragon 7s Gen 2 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे जो 2.4GHz क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी मोटोरोला ऐज 2024 ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP Sony LYT700 सेन्सर देण्यात आला आहे जो 13MP Ultra wide लेन्ससह मिळून चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा मोबाईल एफ/2.4 अपर्चर असलेला 32MP Front Camera ला सपोर्ट करतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Motorola Edge 2024 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh Battery देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा फुल चार्ज केल्यानंतर 36 तासांपर्यंत काम करू शकते. तसेच मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 68W TurboPower वायर्ड चार्जिंग तसेच 15W wireless चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते.

इतर फिचर्स : मोटोरोला ऐज 2024 IP68 रेटिंगसह आला आहे जो याला वॉटरप्रूफ बनवितो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, NFC आणि Bluetooth 5.2 सारखे पर्याय मिळतात. Motorola Edge 2024 21 5G Bands ला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here