Jio-Airtel ची डोकेदुखी वाढवणारी BSNL ची जबरदस्त ऑफर; या दोन रिचार्जवर मिळतोय अतिरिक्त 75GB डेटा

खाजगी कंपन्यांचे ग्राहक आपल्याकडे वळवण्याचा विडाच जणू सरकारी कंपनी BSNL नं उचलला आहे. बीएसएनएल प्रायव्हेट कंपन्यांना टक्कर देणारे रिचार्ज प्लॅन्स सादर करत आहे. हे प्लॅन्स कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देतात. त्यामुळे कंपनीच्या ग्राहक संख्येत देखील वाढ झाली आहे. आता BSNL नं आपल्या युजर्सना खुश करत दोन प्रीपेड प्लॅन्सवर 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत अतिरिक्त एक्स्ट्रा डेटा देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये 2,399 रुपये आणि 2,999 रुपयांच्या दोन प्रीपेड प्लॅनचा समावेश आहे. दोन्ही प्लॅन्ससह युजर्सना ऑफर या कालावधीत रिचार्ज केल्यास अतिरिक्त डेटा कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना दिला जात आहे. चला जाणून घेऊया नेमकी ऑफर काय आहे ते.

बीएसएनएलची शानदार ऑफर

बीएसएनएल आपल्या 2399 रुपये आणि 2999 रुपयांचा प्लॅनसह अतिरिक्त 75GB डेटा देत आहे. या एक्सट्रा डेटासाठी कंपनी युजर्सकडून कोणतंही शुल्क घेणार नाही. परंतु या फ्री डेटासाठी युजर्सना रिचार्ज या माहीमच्या अखेरपर्यंत म्हणजे 31 ऑगस्ट 2022 च्या आधी करावा लागेल. ही ऑफर त्या लोकांसाठी बेस्ट आहे जे एकाच वेळी वर्षभराची वैधता असलेल्या प्लॅनचा शोध घेत आहेत.

BSNL Rs 2999 Recharge

BSNL च्या 2999 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना 365 दिवसांची वैधता मिळते. तसेच प्लॅनमध्ये युजर्सना डेली 3GB डेटा दिला जात आहे. तसेच युजर्सना फ्रीमध्ये 75GB data एक्स्ट्रा मिळेल. या हिशोबाने ग्राहकांना एकूण 1170GB डेटा वापरण्यासाठी दिला जाईल. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते, म्हणजे ग्राहक कोणत्याही नेटवर्क अमर्याद कॉलिंग करू शकतात. तसेच रिचार्जमध्ये रोज 100 SMS, PRBT आणि Eros Now चा 30 दिवसांचा फ्री अ‍ॅक्सेस देखील मिळतो.

BSNL चा 2399 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 2399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील 365 दिवसांची वैधता मिळते. तसेच, युजर्सना प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतात. अन्य बेनिफिट्स पाहता ओटीटीचा फायदा देत कंपनी आपल्या प्लॅनमध्ये 30 दिवसांचे इरोज नाउचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. तसेच रिचार्जमध्ये युजर्सना 75 GB डेटा एक्सट्रा मिळतो. त्यामुळे ग्राहकांना एकूण 803GB डेटा वापरता येईल. त्याचबरोबर प्लॅनमध्ये 30 Days साठी PRBT बेनिफिट देखील मिळेल.

94 रुपयांमध्ये 45 दिवसांची वैधता

बीएसएनएलच्या ज्या प्लॅनबाबत आम्ही बोलत आहोत तो BSNL Special Voucher आहे. या व्हाउचरची किंमत फक्त 94 रुपये आहे आणि यात एकूण 45 दिवसांची वैधता युजर्सना मिळते. या प्लॅनची किंमत 94 रुपये आहे. तसेच युजर्सना 45 दिवसांची वैधता मिळते. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये युजर्सना 3GB डेटा देखील दिला जात आहे. हा डेटा कोणत्याही डेली लिमिटविना येतो. त्यामुळे प्लॅन सक्रिय असेपर्यंत तुम्ही कधीही आणि कितीही डेटा वापरू शकता.

बेनिफिट्स इथेच थांबत नाहीत. या रिचार्ज प्लॅनमध्ये 200 व्हॉइस मिनट्स देखील दिले जात आहेत. यांचा वापर युजर्स कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी करू शकतात. जेव्हा हे मिनिट्स संपतील तेव्हा तुम्हाला 30 पैसे प्रति मिनट या दराने शुल्क द्यावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here