भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने चालू आणि नवीन प्लान वाउचर्स वर 25 टक्के अतिरिक्त डेटा देणाऱ्या एका नवीन प्रमोशनल ऑफरची घोषणा केली आहे, त्यात स्पेशल टॅरिफ वाउचर (STV) चा समावेश आहे जो यूजर्सना डेटा देईल. हि ऑफर 31 ऑक्टोबरला समाप्त होईल. जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरच रिचार्ज करा. कंपनीने ‘कस्टमर डिलाईट मंथ ’अंतर्गत 25 टक्के अतिरिक्त डेटा देऊ केला आहे, जो बीएसएनएलच्या व्यवसायाला 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सादर केला गेला आहे.
बीएसएनएलने सध्या हि ऑफर काही सर्किल मध्ये सादर केली आहे. बीएसएनएल तामिळनाडूच्या सर्कुलरनुसार, ग्राहकांना डेटा बेनिफिट्स सह येणाऱ्या त्यांच्या चालू किंवा नवीन वाउचर्स/एसटीवी वर 25 टक्के डेटा मिळेल. पोस्टर वरून समजले आहे कि हि प्रोमोशनल ऑफर सुरु झाली आहे आणि 30 ऑक्टोबर पर्यंत वैध राहील. तामिळनाडू व्यतिरीक्त हि ऑफर तेलंगाणा मध्ये पण उपलब्ध आहे. BSNL तेलंगाणाने ट्वीट करून याची माहिती दिली आहे.
अलीकडेच बीएसएनएलने ब्रॉडबॅंड प्लान 200GB CS111 मंथली, 300GB CS112 मंथली आणि PUN 400GB मंथली नावाने सादर केले होते. या प्लान मध्ये यूजर्सना 400जीबी पर्यंत हाई-स्पीड डेटा दिला जात आहे. एक रिपोर्टनुसार, 200GB CS111 Monthly, 300GB CS112 Monthly आणि PUN 400GB Monthly तिन्ही प्लान पंजाब सर्कल मध्ये उपलब्ध आहेत.
200 जीबी सीएस111 मंथली प्लान बद्दल बोलायचे तर यात सब्सक्राइबरला 50Mbps स्पीड सह 200जीबी पर्यंत डेटा मिळेल. तसेच डेटा संपल्यावर सब्सक्राइबर्सना 4Mbps वर डेटा मिळेल. या प्लान मध्ये वॉयस कॉलिंग बेनेफिट उपलब्ध नाहीत तसेच याची मंथली किंमत 490 रुपये आहे.














