10 फेब्रुवारीला OTT वर रिलीज होणार स्वदेशी Money Heist; Farzi चा Trailer आउट

Highlights

  • Farzi Web Series चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
  • या थ्रिलर Farzi सीरिजचा Trailer इथे पाहा.
  • फर्जी वेब सीरीज 10 फेब्रुवारीला प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल.

Shahid Kapoor पहिल्यांदाच OTT Platform वर येत आहे. हा डिजिटल डेब्यू Farzi Web Series च्या माध्यमातून होईल. काही दिवसांपूर्वीच फर्जी टीमनं घोषणा केली होती की ही वेब सीरीज 10 फेब्रुवारीला ऑनलाइन रिलीज केली जाईल. आज Farzi Trailer out झाला आहे. ही रोमांचक आणि थ्रिलर सीरीज Amazon Prime Video वर पाहता येईल. हीचा मजेदार ट्रेलर तुम्ही इथे पाहू शकता. या वेब सीरीजच्या काही गोष्टी सुपरहिट वेब सीरिज Money Heist सारख्या वाटतात.

Farzi वेब सीरीजची गोष्ट

ट्रेलर पाहिल्यावर फर्जी वेब सीरीजच्या गोष्टीचा अंदाज लावता येतो. शाहिद कपूर (Shahid Kapoor) या सीरीजमध्ये मध्यवर्गीय कुटूंबातील पैसे कमवू पाहणारा तरुण आहे. यासाठी तो मित्रांसोबत बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरु करतो. या टीममध्ये शाहिद कपूर प्रमुख आहे जो बनावट नोटा डिजाईन करतो. त्याने बनवलेल्या नोटा इतक्या परफेक्ट असतात की असली नोटांसारख्या दिसतात. हे देखील वाचा: 16 हजारांच्या बजेटमध्ये आला Samsung Galaxy A14 5G; पाहा किंमतीला साजेशे फीचर्स आहेत का?

या धंद्याची चाहूल विजय सेतुपतीला (Vijay Sethupathi) लागते जो सुरक्षा विभागात काम करतो. या धंद्यातील जुना खेळाडू म्हणजे केके मेनन (Kay Kay Menon) एक वेगळा ट्विस्ट घेऊन येतो. जंगलात एकच सिंह असू शकतो या धर्तीवर हे दोघे एकमेकांशी भिडतील तर विजय सेतुपती यांना अटक करण्याचे प्रयत्न करेल, अशी या आगामी वेब सीरिजची गोष्ट असू शकते.

कुठे पाहता येणार फर्जी

Farzi Web Series येत्या 10 फेब्रुवारीला Prime Video वर रिलीज होईल. ही अ‍ॅमेझॉन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 10 फेब्रुवारीपासून पाहता येईल. सीरीज निर्माते एकाच वेळी सीरीजचे अनेक एपिसोड रिलीज करतील. त्यामुळे तुम्ही फर्जी वेब सीरीज बिंज-वॉच (Binge-watching) करू शकता. प्राइम व्हिडीओच्या प्रत्येक प्रकारच्या सब्सक्रिप्शन प्लॅनवर फर्जी वेब सीरीज पाहता येईल. हे देखील वाचा: 11 हजारांत दीड लाखांच्या आयफोनचे फिचर; डायनॅमिक आयलंडसह LeEco S1 Pro लाँच

Farzi Web Series Cast

फर्जी वेब सीरीजची निर्मिती प्राइम वीडियोसाठी The Family Man बनवणाऱ्या Raj-DK (Raj Nidimoru आणि Krishna DK) या जोडीने केली आहे. Crime आणि Thriller जॉनरच्या या वेब सीरीजमध्ये Shahid Kapoor, Vijay Sethupathi आणि Kay Kay Menon सोबतच Raashi Khanna, Regina Cassandra, Zakir Hussain, Bhuvan Arora, Amol Palekar आणि Kubbra Sait प्रमुख भूमिका साकारताना दिसतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here