Super AMOLED डिस्प्लेसह Realme 10 भारतात लाँच; जोडीला 5000mAh ची बॅटरी

रियलमीनं गेल्या महिन्यात Realme 10 Pro आणि Realme 10 Pro+ भारतात लाँच केले आहेत. हे हॅन्डसेट मिडरेंज स्मार्टफोन युजर्ससाठी सादर करण्यात आला आहेत. परंतु म्हणून कंपनीनं आपल्या बजेट फ्रेंडली फॅन्सकडे दुर्लक्ष केलं नाही. कंपनीनं आज भारतात Realme 10 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये एकूण 16GB रॅमची ताकद मिळते. तसेच यात 6.5 इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले, MediaTek Helio G99 प्रोसेसर, 50MP Dual Rear कॅमेरा, 16MP Selfie Camera, 33W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery देण्यात आली आहे.

Realme 10 Specifications

  • 6.5 इंच फुलएचडी प्लस सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • 8जीबी रॅम + 8जीबी रॅम
  • MediaTek Helio G99 प्रोसेसर
  • 50MP ड्युअल रियर कॅमेरा
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 33W फास्ट चार्जिंग 5,000mAh ची बॅटरी

रियलमी 10 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: अंबानी पाठोपाठ अदानीही 5G च्या मैदानात, यंदा सुरु करणार नवं नेटवर्क

Realme 10 4G च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

Realme 10 4G Price In India

Realme 10 4G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट कंपनीनं भारतीयांच्या भेटीला आणले आहेत. यातील बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत कंपनीनं 13,999 रुपये ठेवली आहे. जो लाँच ऑफर अंतर्गत मर्यादित कालावधीसाठी 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे देखील वाचा: काय सांगता! मिल्ट्री दर्जाचा स्मार्टफोन आला बाजारात; Lenovo ThinkPhone घालणार बाजारात धुमाकूळ?

Realme 10 4G स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मोठा मॉडेल मात्र 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, कंपनीनं यावर कोणतीही लाँच ऑफर सादर केली नाही. हा स्मार्टफोन रश ब्लॅक आणि क्लॅश व्हाइट अशा दोन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची विक्री 15 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन रियलमी डॉट कॉम आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. तसेच ऑफलाइन मार्केटमध्ये देखील हा हँडसेट उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here