Xiaomi Mi 11X सीरीज आणि Mi 11 Ultra लॉन्चसाठी सज्ज, जाणून घ्या RAM आणि स्टोरेज क्षमता

शाओमी भारतात या आठवड्यात Xiaomi Mi 11X आणि Mi 11X Pro स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. शाओमीचे दोन्ही स्मार्टफोन लॉन्चपूर्वी या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्टोरेज आणि रॅमची माहिती समोर आली आहे. शाओमी भारतात 23 एप्रिलला तीन स्मार्टफोन Mi 11X, Mi 11X Pro आणि Mi 11 Ultra लॉन्च करेल. हे तिन्ही स्मार्टफोन कंपनीचे लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहेत. या अपकमिंग स्मार्टफोन्सची किंमत आतापर्यंत समोर आली नाही. पण, या स्मार्टफोनच्या रॅम आणि स्टोरेजसंबंधित काही हिंट देत आहोत. (Xiaomi MI 11X MI 11X Pro and MI 11 Ultra Indian variants leaked)

टिपस्टर मुकुल शर्माने ट्वीट करून सांगितले आहे कि शाओमीचे अपकमिंग स्मार्टफोन Xiaomi Mi 11X आणि Mi 11X Pro स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेजसह 8GB RAM सह सादर केले जाऊ शकतात. तसेच दुसरीकडे Xiaomi Mi 11 Ultra स्मार्टफोन सिंगल 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलमध्ये सादर केला जाऊ शकतो. या सर्व स्मार्टफोनमध्ये UFS 3.1 स्टोरेज आणि LPDDR5 रॅम दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 6000mAh बॅटरी आणि 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Mi 11 Ultra शाओमीचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन

या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये Mi 11 Ultra कंपनीचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. बोलले जात आहे कि शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत जवळपास 1,00,000 रुपये असू शकते. शाओमीचा हा स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेट आणि 50MP + 48MP + 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, क्वाड क्वर्ड Dolby Vision AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाईल. डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 1,700 निट्स आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरीसह 67W वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत

तसेच शाओमीच्या Mi 11X सीरीज स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा Samsung E4 डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट, 7.8mm स्लीक डिजाइन, 4,520mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग आणि IP53 प्रोटेक्शन आणि डुअल स्टीरियो स्पीकर सारखे फीचर दिले जाऊ शकतात. हे स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह सादर केले जाऊ शकतात. Xiaomi Mi 11X स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेट आणि 48MP प्राइमेरी कॅमेरा, Mi 11X Pro स्मार्टफोनमध्ये Snapdragon 888 चिपसेट आणि 108MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here