6000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy F13 फोनवर ईएमआय ऑफर; जाणून घ्या माहिती

6000mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, 8MP चा सेल्फी कॅमेरा आणि Exynos 850 प्रोसेसर असलेला Samsung Galaxy F13 स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वी भारतात लाँच करण्यात आला होता. मोठी बॅटरी आणि कमी किंमत या दोन गोष्टींमुळे या हँडसेटला ग्राहकांकडून चांगलं प्रतिसाद मिळत आहे. आता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सॅमसंगचा हा लेटेस्ट स्मार्टफोन Samsung Galaxy F13 धमाकेदार ऑफरसह उपलब्ध झाला आहे.

जर तुम्ही सॅमसंगचा हा बजेट स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही. सॅमसंगच्या या दमदार फोनवर ICICI आणि HDFC बँकेच्या कार्ड धारकांना डिस्काउंट आणि EMI बेनिफिट मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला लेटेस्ट Samsung Galaxy F13 स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy F13 ऑफर

Samsung Galaxy F13 स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 11,999 रुपये आहे. परंतु सॅमसंगच्या या फोनवर ICICI आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड युजर्सना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा हँडसेट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच युजर्स हा फोन फक्त 416 रुपयांच्या मासिक हप्त्यांवर विकत घेऊ शकतात. या ऑफर्स व्यतिरिक्त तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून या हँडसेटची किंमत कमी करू शकता.

Samsung Galaxy F13 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. यातील 4GB रॅम व 64GB स्टोरेज व्हेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन नाईट स्काय ग्रीन, सनराईज कॉपर आणि वॉटरफॉल ब्लू अशा तीन रंगात विकत घेता येईल.

Samsung Galaxy F13 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6-इंच FHD+ डिस्प्ले
  • Exynos 850 प्रोसेसर
  • 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज
  • Android 12 OS बेस्ड OneUI 4.1
  • 50MP कॅमेरा
  • 6,000mAh बॅटरी

Samsung Galaxy F13 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F13 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे, सोबत 5MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. स्मार्टफोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीचा Exynos 850 प्रोसेसर मिळतो. त्याचबरोबर सॅमसंगच्या या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Mali G52 देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन 4GB RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे. या फोनमध्ये Android 12 आधारित OneUI 4.0 कस्टम स्किन देण्यात आली आहे.

सॅमसंगच्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सुरक्षेची काळजी घेतो. फोनची सर्वात मोठी खासियत यातील 6000mAh ची अवाढव्य बॅटरी, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here