Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर

Highlights

  • Ola S1 आणि S1 Pro चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत.
  • ओला एस1 एयर 2 kWh व्हेरिएंटसाठी रिजर्वेशन विंडो खुली करण्यात आली आहे.
  • भाविश अग्रवाल यांनी कंपनीची आगामी इलेक्ट्रिक बाइक टीज केली आहे.

Ola Electric नं आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपचा विस्तार करत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स जोडल्या आहेत. कंपनीनं electric scooters S1 आणि S1 Pro चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. OLA S1 Air तीन नवीन व्हेरिएंटमध्ये आणि OLA S1 एका नवीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या Ola S1 Air scooter च्या नवीन लो बॅटरी व्हेरिएंटची प्रारंभिक किंमत 84,999 रुपये आणि S1 scooter च्या नवीन व्हेरिएंटची किंमत 99,999 रुपये (एक्स शोरूम) आहे. पुढे आम्ही तुम्हाला दोन्ही स्कूटर lच्या नवीन व्हेरिएंटची संपूर्ण माहिती दिली आहे.

कधी सुरु होईल बुकिंग

बुकिंग पाहता ओला इलेक्ट्रिकनं काल आपल्या ओला एस1 एयर 2 kWh व्हेरिएंटसाठी रिजर्वेशन विंडो खुली केली आहे. स्कूटरची डिलिव्हरी यावर्षी जुलैपासून सुरु केली जाणार आहे. तसेच कंपनीनं आपल्या S1 2kWh स्कूटर्ससाठी परचेज विंडो देखील खुली केली आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटलं आहे की रिवाइज्ड बॅटरी पॅकमुळे डिलिव्हरी तीन महीने उशिरा झाली आहे. हे देखील वाचा: आता 7 हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार Realme C30s; कंपनीनं कमी केली किंमत

OLA Electric Scooter Price

सर्वप्रथम OLA S1 Air च्या तिन्ही नवीन व्हेरिएंटची किंमत पाहूया. OLA S1 Air च्या 2kWh battery pack variant ची किंमत 84,999 रुपये, 3kWh व्हेरिएंटची प्राइस 99,999 रुपये आणि 4kWh व्हेरिएंटची प्राइस 1,09,999 रुपये आहे. S1 Air आधी ऑक्टोबर 2022 मध्ये 2.5kWh च्या बॅटरीसह लाँच करण्यात आली होती जी आता डिस्कंटिन्यू करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे कंपनीनं OLA S1 चा नवीन 2 kWh बॅटरी कपॅसिटी व्हेरिएंट 99,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. तसेच OLA S1 चा 3 kWh व्हेरिएंट 1,09,999 रुपये व OLA S1 Pro 4 kWh व्हेरिएंट 1,29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
नोट: सर्व प्राइस एक्स शोरूम आहेत.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर की रेंज आणि फीचर्स

ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कटूरची बॅटरी रेंज पाहता OLA S1 Airt Scooter च्या 2kWh, 3kWh आणि 4kWh battery pack variant मध्ये अनुक्रमे 85km, 125km व 165km IDC (Indian Driving Cycle) ranges मिळेल. तसेच जर तुम्ही आधी 2.5kWh व्हेरिएंट बुक केला असेल तर काळजी नसावी कारण तुम्हाला 3kWh व्हेरिएंट एक रुपया जास्त न देता अपग्रेड म्हणुन मिळेल. तिन्ही व्हेरिएंटमध्ये 85 KM चा टॉप स्पीड व 4kw ची मोटर देण्यात आली आहे.

त्याचबरोबर S1 सीरीजचे मिड-स्पेक मॉडेल पाहता यात देखील एक नवीन व्हेरिएंट आला आहे. ओला एस1 आता 2kWh बॅटरी पॅक व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. या व्हेरिएंटमध्ये 91 किमी (आयडीसी) रेंज आणि ताशी 90 किमीचा टॉप स्पीड मिळेल.हे देखील वाचा: लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात

येतेय ओला इलेक्ट्रिक बाइक

इलेक्ट्रिक स्कूटर व्यतिरिक्त भाविश अग्रवाल यांनी कंपनीची आगामी इलेक्ट्रिक बाइक टीज करण्यासाठी पठाण स्टाइल वापरली आहे. अग्रवाल म्हणाले, “कुर्सी पेटी बांध लो क्यूंकी, मौसम बिगडने असलेला आहे.” इव्हेंटमध्ये कंपनीनं आपली ओला इलेक्ट्रिक बाइक टीज केली. दरम्यान बाइकच्या डिजाइन व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here