लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात

Highlights

  • iQOO Neo 7 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • हा फोन 12GB RAM+256GB Storage मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
  • फोनची लाँच प्राइस व ऑफर प्राइस लीकमध्ये समोर आली आहे.

iQOO Neo 7 5G फोन 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होणार आहे. हा भारतात येणारा आयकू नियो सीरीजचा दुसरा स्मार्टफोन असेल तसेच प्रोसेसिंगसाठी यात Mediatek Dimensity 8200 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनचे स्पेसिफिकेशन्स अनेक लीक्समधून समोर आले आहेत परंतु आज लाँचपूर्वीच फोनच्या भारतातील किंमतीचा देखील खुलासा झाला आहे. नवीन लीकमध्ये फोनच्या मेमरी व्हेरिएंट्स, कलर ऑप्शन्स, प्राइस व सेल ऑफर्सची माहिती मिळाली आहे.

iQOO Neo 7 5G Price

आयकू नियो 7 च्या किंमतीची माहिती पारस गुगलानीनं दिली आहे. टिपस्टरनुसार हा मोबाइल फोन भारतात 12 जीबी रॅमसह लाँच केला जाईल ज्यात 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनची किंमत लीकमध्ये 34,999 रुपये सांगण्यात आली आहे.
टिपस्टरनुसार हा फोन 19 किंवा 20 फेब्रुवारीपासून सेलसाठी उपलब्ध होईल तसेच बँक व एक्सचेंज ऑफर अंतगर्त याची किंमत 30,999 रुपये होईल. लीकनुसार आयकू नियो 7 5जी फोन भारतीय बाजारात Interstellar Black आणि Frost Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: एकदम गोळीगत! 240W Fast Charging सह Realme GT Neo5 लाँच; नाव बदलून येणार भारतात?

iQOO Neo 7 5G Specifications

आयकू नियो 7 5जी फोन चायनामध्ये लाँच झालेल्या आयकू नियो 7 एसईचा रीब्रँडेड व्हर्जन असेल. त्यामुळे या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे असतिल. चीनमधील नियो 7एसई 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

आयकू नियो 7एसई मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटसह लाँच झाला आहे तसेच हा प्रोसेसर iQOO Neo 7 5G फोनमध्ये देखील मिळू शकतो. आयकू नियो 7एसई 16जीबी रॅमवर लाँच झाला होता परंतु नवीन लीकमध्ये नियो 7 5जी 12जीबी रॅमसह समोर आला आहे. त्यामुळे हा फोन 16जीबी रॅमसह लाँच होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: आता 7 हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार Realme C30s; कंपनीनं कमी केली किंमत

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 5जी फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here