यावर्षी भारतीयांनी खरेदी केले 50 हजार कोटी रुपयांचे चाइनीज फोन : रिपोर्ट

देशात कुठे ना कुठे तरी चीनी प्रोडक्ट्स वर बहिष्कार टाकला पाहिजे असे बोलले जात असते. चीन मध्ये बनलेल्या वस्तूंचा वापर कर नये, फक्त मेड इन इंडिया वस्तू वापरल्या पाहिजेत. बोलणारे कितीही बोलले तरी सत्य असे आहे कि भारतीय स्मार्टफोन मार्केट आता चीनी प्रोडक्ट्स व चीनी स्मार्टफोन्स साठी मोठा बाजार बनत आहे. भारतात विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्ससंबंधित असचेक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि यावर्षी फक्त 10 महिन्यांत भारतीयांनी 50 हजार कोटी रुपयांचे चीनी मोबाईल फोन विकत घेतले आहेत.

प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट ने आपल्या रिपोर्ट मध्ये याचा खुलासा केला आहे ​साल 2018 मध्ये आता पर्यंत 50 हजार कोटी रुपयांचे चीनी मोबाईल फोन इंडियन यूजर्सने खरेदी केले आहेत. विशेष म्हन्जे यात वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांच्या सेलचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजे कोटींच्या या आकड्यांमध्ये दिवाळी व ​क्रिसमस सारख्या सणांची शॉपिंग जोडलेली नाही. आणि जर संपूर्ण वर्षभरात विकल्या गेलेले स्मार्टफोन व फीचर फोन जोडले तर हा एकदा 50 हजार कोटींपेक्षा वर जाईल.

भारतीय स्मार्टफोन बाजारावर पसरणाऱ्या चीनी कंपन्यांमध्ये शाओमी सर्वात वर आहे. शाओमी सोबतच ओपो, वीवो आणि आॅनर ने पण भारतीय बाजारात मजबूत स्थिति बनवली आहे. रिपोर्टनुसार साल 2018 मध्ये खरेदी केल्या गेलेल्या चीनी स्मार्टफोन्सची हि संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. शाओमी, ओपो, वीवो आणि आॅनर सोबतच वनप्लस तसेच इनफिनिक्स ने मिळून भारताच्या 50 टक्के मोबाईल बाजारावर कब्जा केला आहे.

दीर्घकाळ भारतात नंबर असणारी कोरियन कपंनी सॅमसंगला पण चीनी कंपन्यांनी मागे टाकेल आहे. याबाबतीत काउंटरप्वाइंट चे म्हणणे आहे कि चीनी ब्रँड्स आपल्या प्रोडक्ट्स व टेक्नॉलिजी मध्ये इनोवेशन करत असतात. या कंपन्यांकडे रिसर्च आणि डेवलपमेंट हब सोबतच सप्लाई चेन आणि इकोसिस्टमचा एक्सेस आहे ज्याचा वापर करून त्या स्मार्टफोन्स मध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणत असतात. तसेच इंडियन मार्केट मध्ये हिट होण्याची सर्वात मोठी यूएसपी ‘कमी किंमत’ हे ब्रँड योग्यरीत्या फॉलो करत आहेत.

काउंटरप्वाइंट ने आपल्या रिपोर्ट सोबत मान्य केले आहे कि चीनी कंपन्या भारतात कमी किंमतीत फोन विकत आहेत आणि लो बजट व मिड रेंज मध्ये या कंपन्यांनी अनेक स्मार्टफोन्स आणले आहेत. सॅमसंग सारख्या ब्रँड्सच्या तुलनेत हे चीनी ब्रँड स्वस्तात उपलब्ध आहेत जे भारतीय यूजर्सना आकर्षित करतात. कमी किंमत आणि चांगले फीचर्सच इंडियन स्मार्टफोन यूजर्सना आर्कषित करतात आणि याच कारणांमुळे आज भारतीय स्मार्टफोन बाजारात चीनी ब्रँड्सचा बोलबाला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here