128जीबी मेमरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो वाय93एस

यावर्षी नोव्हेंबर मध्ये चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवो ने वाय93तएस मॉडेल सादर केला होता. तर आज कंपनी ने याचा अपग्रेड वर्जन वाय93एस सादर केला आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर वी1818सीए आणि वी1818सीटी नावाने लिस्ट झाला होता. कंपनी ने अधिकृतपणे आपल्या वेबसाइट वर हा लिस्ट केला गेला आहे. हा फोन अजूनतरी चीन मध्ये लॉन्च झाला आहे पण लवकरच भारतात पण हा येईल. कमी रेंजचा हा फोन 128जीबी मेमरी आणि नवीन प्रोसेसर सह उपलब्ध आहे.

वीवो वाय93एस चे स्पेसिफिकेशन
वीवो वाय93एस कंपनी ने आपल्या नवीन हॅलो नॉच स्क्रीन सह सादर केला आहे. फोन मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो वाला 6.2-इंचाचा आईपीएस एनटसी डिस्प्ले मिळेल. फोनचा स्क्रीन रेजल्यूशन एचडी+ आहे. पण कंपनी ने प्रोटेक्शन बद्दल माहिती दिली आहे.

वीवो वाय93 कंपनी ने क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर सादर केला होता आणि त्यात 64जीबी मेमरी होती. तर वीवो वाय93एस मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2.0गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे देण्यात आली आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि हा फोन 256जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13एमपी + 2एमपीचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पीडीएएफ सपोर्ट सह येतो. तसेच सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा एआई कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. यात तुम्हाला फेस ब्यूटी सारखे मोड मिळतील जे फोटो इन्हांस करतात.

वीवो वाय93एस मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. हा फोन फनटच 4.5 वर चालतो आहे जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. या फोन मध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार नाही. कंपनी ने फेस अनलॉक दिला आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,030 एमएएच ची मोठी बॅटरी आहे. हा फोन रेड आणि ब्लॅक सहित दोन रंगांत उपलब्ध आहे. चीन मध्ये वीवो वाय93एस ची प्राइस 1698 यूआन आहे जी भारतीय करन्सीनुसार जवळपास 17,500 एवढी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here