6GB रॅम आणि A14 Bionic SoC सह Apple iPhone 12 Pro Max झाला वेबसाइट वर लिस्ट

टेक्नोलॉजी विश्वातील दिग्गज कंपनी ऍप्पल लवकरच आपली नवीन आयफोन 12 सीरीज सादर करणार आहे. कंपनीने या सीरीजच्या लॉन्च डेट बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. लीक्सनुसार या नवीन सीरीज मध्ये iPhone 12, iPhone 12 Max, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max सादर केला जाईल. आता आलेल्या रिपोर्टनुसार आयफोन 12 प्रो मॅक्स बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म AnTuTu वर दिसला आहे, जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट वर स्कोर गेल्यावर्षीच्या iPhone 11 Pro Max पेक्षा जास्त आहे.

असे वाटत आहे कि iPhone 12 Pro Max कंपनीचा पहिला फोन असेल जो 6GB रॅम सह येईल. त्याचबरोबर फोन मध्ये 128GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल. हि माहिती बेंचमार्किंग लिस्टिंग मध्ये समोर आली आहे. स्क्रीन शॉट मध्ये पण माहिती समोर आली आहे कि iPhone 12 Pro Max लेटेस्ट iOS 14.1 सॉफ्टवेयर सह येईल. 5nm A14 बायोनिक ए 13 बायोनिकच्या तुलनेत सीपीयू आणि जीपीयूचे प्रदर्शन दमदार असेल.

अलीकडेच एका विडियोच्या माध्यमातून आयफोन 12 प्रो बाबत माहिती समोर आली होती. विडियो मध्ये 6.1-इंचाच्या आयफोन 12 प्रो मॉडेलची चॅसी (Chassis) दाखवण्यात आली होती. फोनच्या चारही बाजूंना फ्लॅट साइड बेजल्स दिसत आहेत. तसेच मागे तीन रियर कॅमेऱ्यांसह LiDAR सेंसर पण दिसला होता.

किंमत

मीडिया रिपोर्टनुसार iPhone 12 ची किंमत $699 (जवळपास 51,200 रुपये) आणि 749 डॉलर (जवळपास 54,800 रुपये) दरम्यान असू शकते, iPhone 12 Max ची किंमत $ 799 (जवळपास 58,500 रुपये) आणि 849 डॉलर (जवळपास 62,200 रुपये) दरम्यान असू शकते.

iPhone 12 Pro ची किंमत $ 1,049 (जवळपास 76,800 रुपये) आणि $ 1,099 (जवळपास 80,500 रुपये) दरम्यान असू शकते आणि तर iPhone 12 Pro Max ची किंमत $ 1,149 (जवळपास 84,100 रुपये) ते $ 1,199 (जवळपास 87,800 रुपये) दरम्यान असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here