स्वस्त JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 4G फीचर फोन, असतील हे फीचर्स

भारतात सर्वात कमी किंमतीत 4G फोन उपलब्ध करवून देणाऱ्या रिलायंस जियोच्या JioPhone आणि JioPhone 2 ला आव्हान देण्यासाठी एक नवीन 4G फीचर फोन येणार आहे. बातमी अशी समोर आली आहे कि HMD Global लवकरच नवीन नोकिया फीचर फोन लॉन्च करू शकते. लीक्सनुसार कंपनी नोकिया ब्रँडचा किफायतशीर 4G फीचर फोन लॉन्च करू शकते. दरम्यान आता नोकियाचा एक फीचर फोन सर्टिफिकेशन वेबसाइट TENAA वर दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या अनेक खास स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

टेना वर नोकियाचा फीचर फोन मॉडेल नंबर TA-1278 सह दिसला आहे. लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये 2.4 इंचाची टीएफटी 240 x 320 पिक्सल रेजोल्यूशन असलेली स्क्रीन असेल. तसेच हँडसेट मध्ये 1 गीगाहर्ट्ज प्रोसेसर आणि 64MB रॅम दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर नोकियाच्या 4जी फीचर फोन मध्ये 128एमबी इंटरनल स्टोरेज असेल. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 32 जीबी पर्यंत वाढवता येईल.

पावर बॅकअपसाठी या 4जी फीचर फोन मध्ये 1150mAh ची बॅटरी असू शकते. लिस्टिंगनुसार डिवाइस ब्लॅक आणि टॉरकोईज कलर मध्ये लॉन्च होईल. तसेच यात यूएसबी पोर्ट, जीएसएम, 4जी एलटीई सपॉर्ट, ब्लूटूथ आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स मिळतील. टेना वर फोनचे फोटोज पण समोर आले आहेत ज्यावरून समजले आहे कि डिवाइस मध्ये कोणताही कॅमेरा नसेल.

Nokia 125 आणि Nokia 150

काही दिवसांपूर्वी भारतात कंपनीने दोन फीचर फोन नोकिया 125 आणि नोकिया 150 सादर केले होते. Nokia 125 आणि Nokia 150 दोन्ही फोन्स मध्ये जवळपास एक सारखे स्पेसिफिकेशन्स आहेत. या फोन्स मध्ये 2.4 इंचाची QVGA (240×320 पिक्सल्स) टीएफटी एलसीडी कलर स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच हँडसेट पॉलीकार्बोनेट बॉडी सह येतात. फोन्स मध्ये फक्त 2G कनेक्टिविटीच देण्यात आली आहे आणि यात ड्यूल सिम – ड्यूल स्टॅण्डबायचा ऑप्शन यूजर्सना मिळतो. दोन्ही फीचर फोन स्टॅंडर्ड फीचर फोन परफॉर्मेंस यूजर्सना देतील.

या दोन्ही डिवाइसेज मध्ये MediaTek प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन्स ऑपरेटिंग सिस्टम system Series 30+ सह येतात. फोन्स मध्ये 4 एमबी रॅम आणि 4 एमबी रोम देण्यात आला आहे आणि 1,020mAh ची रिमूवेबल बॅटरी देण्यात आली आहे. चार्जिंग कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोन मध्ये माइक्रोयूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

Nokia 125 मध्ये VGA कॅमेरा नाही, जो Nokia 150 मध्ये मिळतो. पण दोन्ही फोन्स मध्ये एलईडी फ्लॅश आणि वायरलेस FM रेडियो सपॉर्ट देण्यात आला आहे. कलर ऑप्शंस पाहता Nokia 125 वाइट आणि ब्लॅक कलर ऑप्शंस मध्ये विकत घेता येईल. तर Nokia 150 ब्लू, रेड आणि ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here