भारतीय बाजारात खूप कमी नॉन चायनीज स्मार्टफोन ब्रँड उरले आहेत. यातील नोकियावर भारतीयांचा खूप आधीपासून विश्वास आहे. आता या ब्रँडच्या मालक HMD Global कंपनीनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन नोकिया स्मार्टफोन Nokia C31 लाँच केला आहे. हा मोबाइल फोन आयपी52 रेटिंग, 6.75” Display, 4GB RAM, 13MP Camera आणि 5,050mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आला असून, हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. पुढे नवीन नोकिया सी31 स्मार्टफोनची संपूर्ण माहिती शेयर करण्यात आली आहे.
Nokia C31 Price
नोकिया सी31 स्मार्टफोन भारतीय बाजारात 2 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 3GB RAM + 32GB Storage देण्यात आली आहे ज्याची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. तसेच मोठा नोकिया सी31 4GB RAM + 64GB Storage सह लाँच झाला आहे ज्याची किंमत 10,999 रुपये आहे. नोकिया सी31 Charcoal, Cyan आणि Mint कलरमध्ये विकत घेता येईल, विशेष म्हणजे कंपनी हा फोन 1 वर्षांच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसह विकत आहे. हे देखील वाचा: जबरदस्त! 240KM च्या दमदार रेंजसह आली इलेक्ट्रिक स्कूटर; डिजाइन आणि फीचर्स देखील एक नंबर
Nokia C31 Specifications
नोकिया सी31 स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला असून एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन यु शेप नॉचसह बाजारात आला आहे. या फोनचे डायमेंशन 169.2 x 78 x 8.6एमएम आणि वजन 200ग्राम आहे. हा नोकिया मोबाइल आयपी52 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टंट बनतो.
Nokia C31 अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो स्टॉक व्हर्जन आहे आणि यात अॅड फ्री अनुभव मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc 9863A1 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नोकिया मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात मिळत आहेत Redmi आणि Mi चे स्मार्ट टीव्ही; सुरु झाला Xiaomi चा Sale Out सेल
Nokia C31 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,050एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. ही बॅटरी तीन दिवसांचा बॅकअप देते असा दावा कंपनीनं केला आहे.
















