सिंगल चार्जवर 631km धावेल Hyundai Ioniq 5; 21 डिसेंबरपासून बुकिंग सुरु

भारतीय इलेक्ट्रिक मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी हुंडईनं आली नवी इलेक्ट्रिक कार Hyundai IONIQ 5 सादर केली आहे. ही कार सिंगल चार्जवर 631 किमीचा प्रवास करू शकते आणि फक्त 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. हुंडाईनं मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर एका इव्हेंटचा आयोजन करून या इलेक्ट्रिक कारवरील पडदा उठवला आहे. तसेच भारतात या ई-कारची बुकिंग देखील सुरु करण्यात आली आहे, ज्यासाठी ग्राहकांना 1 लाख रुपयांची बुकिंग अमाऊंट द्यावी लागेल. या इलेक्ट्रिक व्हेईकलची बुकिंग 21 डिसेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. परंतु कंपनीनं या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीचा खुलासा मात्र केला नाही.

Hyundai IONIQ 5 मधील फीचर्स

Hyundai Ioniq 5 मध्ये दोन 12.3-इंचाच्या स्क्रीन (इंफोटेनमेंट सिस्टम आणि इंस्ट्रूमेंटसाठी एक-एक यूनिट) आहेत. तसेच यात आठ-स्पिकर म्यूजिक सिस्टम, ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, एक पावर्ड टेलगेट, हीटेड आणि हवेशीर फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस चार्जिंग देण्यात आली आहे.

Hyundai IONIQ 5 बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं ही E-GMP (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म) वर बनवली आहे आणि हा पहिला मॉडेल पंप-टू-प्लग रिवोल्यूशन सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. खास फीचर्स पाहता Hyundai IONIQ 5 मध्ये 21 Hyundai SmartSense (लेव्हल 2 ADAS) देण्यात आले आहेत.

डाइमेंशन पाहता Hyundai Ioniq 5 ची लांबी 4,635mm, रुंदी 1,890mm आणि उंची 1,625mm आहे. मॉडेलचा व्हीलबेस 3,000mm आहे. मॉडेल तीन कलर ऑप्शन- मॅट ग्रेविटी गोल्ड, ऑप्टिक व्हाइट आणि मिडनाइट ब्लॅक पर्लमध्ये विकला जाईल. तसेच सुरक्षेसाठी Hyundai Ioniq 5 मध्ये सहा एयरबॅग, EBD सह ABS, VESS, EPB, MCB आणि सर्व चार डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

Hyundai Ioniq 5 मध्ये ‘पॅरामेट्रिक पिक्सेल’ एलईडी हेडलॅम्प, इंटीग्रेटेड स्किड प्लेट्ससह फ्रंट आणि रियर बंपर, अ‍ॅक्टिव्ह एयर फ्लॅप्स (AAF), 20-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, फ्लश-फिटिंग डोर हँडल, एलईडी टेल लाइट्स, शार्क-फिन अँटीना, इंटीग्रेटेड स्पॉइलर आणि रेक्ड रियर विंडशील्ड देण्यात आली आहे. हे देखील वाचा: फक्त 520 रुपयांमध्ये घरी आणा रियलमीचा 5G Phone! Realme 9i 5G मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध

चार्जिंग आणि रेंज

Hyundai Ioniq 5 मध्ये 72.6kWh चा बॅटरी पॅक आहे जो 214bhp पावर आउटपुट आणि 350Nm टार्क देतो. रिपोर्ट्सनुसार, ही कार एकदा चार्ज केल्यास 631 किमीची एआरएआय-सर्टिफिकेशन रेंज मिळेल. तसेच ग्राहक कंपनीच्या 350kw डीसी चार्जरचा वापर करून फक्त 18 मिनिटांत 10-80 टक्के फास्ट चार्जिंगचा फायदा घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here