Okaya Faast F3 Electric Scooter च्या लाँच डेटची घोषणा; पुढील आठवड्यात येणार वेगवान EV

Highlights

  • Okaya Faast F3 Electric Scooter 10 फेब्रुवारीला लाँच होईल.
  • Okaya Faast F3 Electric Scooter मध्ये जबरदस्त रेंज मिळेल.
  • Okaya Faast F3 भारतात लाँच होणारी वेगवान ई-स्कूटर असेल.

देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये नव्या व जुन्या कंपन्या सतत नवीन ई-स्कूटर्स लाँच करत आहेत. जर तुम्ही एक New Electric Scooter घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे Okaya Faast F3 नावानं नवीन बॅटरी असलेली स्कटूर लाँच होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं आपल्या आगामी ईव्हीचा लाँच टीज करण्यास सुरुवात केली आहे.

10 फेब्रुवारीला येईल ई-स्कूटर

कंपनीनं आपल्या वेबसाइटवर Okaya Faast F3 चं प्रोडक्ट पेज लाइव्ह केलं आहे. या प्रोडक्ट पेजवर लाँच काउंटडाउन सुरु करण्यात आला आहे. या काउंटडाउननुसार 10 फेब्रुवारीला नवीन ई-स्कूटर भारतात सादर केली जाईल. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार कंपनी ही स्कूटर एका ऑनलाइन इव्हेंटच्या माध्यमातून भारतीय बाजारात सादर करेल. परंतु फीचर्स बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. एवढं मात्र नक्की आहे की या ई-स्कूटर मध्ये 1200W ची मोटर आणि 2500W ची पीक पावर मिळेल. हे देखील वाचा: तब्बल 180 दिवस चालणार BSNL चा जबरदस्त प्लॅन; मोफत कॉलिंग आणि रोज 2GB डेटा

ओकायाच्या आगामी नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी, रेंज आणि स्पीडबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु एक गोष्ट समजली आहे की Okaya Fasst F3 मध्ये 2000 वॉटची इलेक्ट्रिक मोटर दिली जाईल. हीचा टॉप स्पीड 70kmph पर्यंत असू शकतो, तसेच बॅटरी रेंज पाहता ओकायाची बॅटरी रेंज 70-80 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते.

ब्रेकिंग सिस्टम पाहता कंपनी ई-स्कूटरच्या फ्रंट व्हील आणि रियर व्हील दोन्हीमध्ये ड्रम ब्रेक देऊ शकते. यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम मिळू शकते. आशा आहे की स्कूटरच्या सस्पेंशन सिस्टममध्ये कंपनी फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन आणि मागे ड्युअल स्प्रिंग लोडेड सस्पेंशनचा वापर करेल जे कंपनीच्या आधीच्या ई-स्कूटरमध्ये दिसले आहेत. हे देखील वाचा: 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Oppo चा 5G Phone लाँच; रेडमी-रियलमीची वाट लावणार का Oppo Reno 8T 5G?

ओकाया कंपनीनं याआधी आपल्या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर केल्या आहेत. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये Faast F4, Freedum आणि ClassicIQ चा समावेश आहे. Faast F3 कंपनीची भारतीय बाजारातील 4 इलेक्ट्रिक स्कूटर असेल. कंपनीनं आगामी स्कूटरच्या किंमतीची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या 10 फेब्रुवारीला येणारी Okaya Faast3 इलेक्ट्रिक स्कूटर 1,13,999 रुपयांमध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here