75KM रेंज सह लाँच झाली Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आहे परवडणारी

Highlights

  • इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक्स शोरूम 99,999 रुपये आहे.
  • Odysse Trot एक B2B इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
  • Odysse Trot चा टॉप स्पीड 25 kmph आहे.

Odysse Electric नं भारतात आपली नवीन बॅटरी असलेली स्कूटर सादर केली आहे. ही ई-स्कूटर कंपनीनं Odysse Trot नावानं B2B मार्केटसाठी सादर केली आहे. बी2बी इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटचा अर्थ असा की हे वाहन सामानाच्या डिलिव्हरी सारख्या व्यवसायिक कामांसाठी वापरलं जाऊ शकतं. तसेच खास फीचर्स पाहता यात 25 kmph चा टॉप स्पीड आणि 75 किमीची रेंज देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Odysse च्या या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि इतर फीचर्सची सविस्तर माहिती.

Odysse Trot ची किंमत

B2B मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आलेल्या TROT ची किंमत पाहता, कंपनीनं ही 99,999 रुपयांमध्ये (एक्स शोरूम) सादर केली आहे. तसेच, ग्राहक ही स्कूटर फक्त 2,000 रुपयांमध्ये कंपनीच्या साइटवरून बुक करू शकतात. हे देखील वाचा: Suzuki भारतात सादर करणार Electric Scooter; जाणून घ्या कधी येईल तुमच्या हातात

बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी

कंपनीनुसार Odysse इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी आणि पावरट्रेनवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. उपलब्धता पाहता ग्राहक Trot इलेक्ट्रिक स्कूटर भारतात Odysse च्या डीलरशिपवरून विकत घेऊ शकतात. ग्राहक ही ई-स्कूटर येलो, ब्लॅक, रेड आणि मारुन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतील.

ODYSSE इलेक्ट्रिक व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ नेमिन वोरा यांनी म्हटलं आहे की, “नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ODYSSE TROT सह आमचं लक्ष्य भारतात व्यावसायिक कामे जसे की डिलिव्हरी इत्यादी पूर्णपणे इलेक्ट्रिक करणं आहे.”

Odysse Trot चे स्पेसिफिकेशन्स

Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 250 Watt ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. त्याचबरोबर यात 60V 32Ah वॉटरप्रूफ डिटॅचेबल बॅटरी देण्यात आली आहे. रेंज पाहता ही एकदा चार्ज केल्यावर 75 किमी पर्यंत चालू शकते. तसेच बॅटरी 2 तासांमध्ये 0 ते 60 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. 100 टक्के चार्ज होण्यास जवळपास 4 तासांचा वेळ लागतो.

कंपनी नुसार Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटरवर 250 किलो पर्यंतची लोडिंग कपॅसिटी आहे. तसेच ही एक आयओटी कनेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी ट्रॅकिंग, जियो-फेंसिंग आणि इमोबिलाइजेशन सपोर्टसह येते. हे देखील वाचा: Okaya Faast F3 Electric Scooter च्या लाँच डेटची घोषणा; पुढील आठवड्यात येणार वेगवान EV

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here