2022 हे वर्ष संपायला आलं आहे आणि वर्षअखेर जर तुम्ही एक Electric Scooter विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. डिसेंबर महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) खरेदी करणाऱ्यांसाठी अनेक कंपन्या आपल्या मॉडेल्सवर शानदार ऑफर देत आहेत, ज्यांचा लाभ घेऊन हजारोंची बचत करता येईल. तुम्हाला सांगू इच्छितो की OLA, Hero Vida, Ather कंपनीच्या ई-स्कूटरवर एक्सचेंज डिस्काउंट व्यतिरिक्त आणि अन्य ऑफर दिल्या जात आहेत. चला जाऊन घेऊया कोणत्या कंपनीद्वारे कोणत्या स्कूटरवर कोणती ऑफर दिली जात आहे.
OLA Electric Scooter
OLA नं आपल्या स्कूटर्सवर अनेक खास ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनी डिसेंबरमध्ये फ्री सर्व्हिस आणि हायपरचार्ज नेटवर्कच्या फ्री वापरासह नवीन स्कूटर विकत घेण्यासाठी झिरो डाउन पेमेंटचा ऑप्शन देत आहे. तसेच, झिरो प्रोसेसिंग फी सोबतच क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास अतिरिक्त डिस्काउंट देण्याची देखील घोषणा केली आहे. या ऑफरच्या लास्ट डेटची माहिती मात्र अद्याप समोर आली नाही. हे देखील वाचा: Bank of Maharashtra Recruitment: 45 वर्षांपर्यंतच्या वयोमर्यादेसह सरकारी बँकेत नोकरी; पगार 1 लाखांपेक्षा जास्त
Vida Electric Scooter
या स्कूटरच्या लाँच दरम्यान एका बाय-बॅक योजेनची घोषणा करण्यात आली होती, जिचा लाभ अजूनही घेता येईल. या बाय-बॅकमध्ये ग्राहकांना स्कूटर खरेदी केल्यानंतर तीन वर्षांमध्ये 70 टक्के किंमतीत कंपनीला पुन्हा विकत येईल. जर तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर या नवीन इलेक्ट्रिक स्कटूरचा विचार करता येईल, जी तीन वर्ष चालवल्यानंतर 70 टक्के पैसे परत घेऊन कंपनीलाच विकत येईल. तसेच ग्राहक 72 तास किंवा 3 दिवस टेस्ट राइड प्लॅनचा देखील फायदा घेऊ शकतात. म्हणजे 3 दिवस ही स्कूटर टेस्ट राइड करा आणि मग खरेदीचा निर्णय घ्या.
Ather Energy
डिसेंबरमध्ये कंपनीनं आपल्या ई-स्कूटरवर आकर्षक ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतगर्त ग्राहकांसाठी स्कूटरच्या बॅटरीवर एक्सटेंडेड वॉरंटी, एक्सचेंज स्कीम आणि स्वस्त फायनान्स प्लॅन सादर केले आहेत. तसेच, एथर एनर्जी (Ather Energy) ची ही स्पेशल ऑफर 31 डिसेंबर 2022 पर्यंत वैध आहे. हे देखील वाचा: 12 महिने 365 दिवस अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग; Vodafone idea नं सादर केले 2 शानदार Plans
Bounce Infinity
Bounce Infinity वर देखील एक शानदार ऑफर मिळत आहे. कंपनीनं आपल्या स्कूटर्सवर रेंटल स्कीम देण्याची घोषणा केली आहे. या ऑफर अंतगर्त ग्राहक स्कूटर खरेदी करण्याआधी काही आठवडे किंवा काही महिने बाउंस इन्फिनिटी स्कूटर रेंटवर घेऊ शकतात. ग्राहक बाउन्स इन्फिनिटी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वरून विकत घेता येईल. सध्या ही रेंटल सुविधा काही निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे.