Bank of Maharashtra Recruitment: 45 वर्षांपर्यंतच्या वयोमर्यादेसह सरकारी बँकेत नोकरी; पगार 1 लाखांपेक्षा जास्त

Bank of Maharashtra Recruitment 2022: बँक ऑफ महाराष्ट्रनं वेगवेगळ्या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण 551 रिक्त पदे भरली जातील. इच्छुक उमेदवार आज 06.12.2022 पासून अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकतात. निवड झालेल्या उमेदवार बँकेत जॉईन करण्याच्या तारखेपासून दोन वर्षांसाठी 2 लाख रुपयांचा बॉन्ड भरेल. बँक ऑफ महाराष्ट्राने स्केल I, III, IV आणि V प्रोजेक्ट 2023-2024 मध्ये अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. तुमचा अर्ज भरण्यासाठी 23 डिसेंबर 2022 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार bankofmaharashtra.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

स्केल I, III, IV आणि V प्रोजेक्ट 2023-2024 मध्ये 551 अधिकाऱ्यांची आवश्यकत आहे. सॅलरी पाहता एजीएम बोर्ड सेक्रेटरी अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स, एजीएम डिजिटल बँकिंग, एजीएम मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमला 1,00,350 रुपये महिना इतका पगार मिळेल. इतर पदांसाठी वेगवेगळा पगार सांगण्यात आला आहे, ज्याची माहिती तुम्ही बँकेच्या वेबसाइटवरून मिळवू शकता. तसेच शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी आहे.

वयोमर्यादा पाहता, एजीएम बोर्ड सेक्रेटरी अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स, एजीएम डिजिटल बँकिंग, एजीएम मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे. चीफ मॅनेजर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, चीफ मॅनेजर मार्केट इकॉनॉमिक अनॅलिस्ट, चीफ मॅनेजर डिजिटल बँकिंग, चीफ मॅनेजर इन्फोर्मेशन सिस्टम ऑडिट, चीफ मॅनेजर सिक्योरिटी ऑफिसर, चीफ मॅनेजर क्रेडिट, चीफ मॅनेजर डिजास्टर मॅनेजमेंट आणि चीफ मॅनेजर पीआर अँड कॉर्पोरेट कम्यूनिकेशनसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष आहे. जनरलिस्ट ऑफिसरसाठी वयोमर्यादा 25 ते 38 वर्ष आहे. तसेच फॉरेक्स ट्रेजरी ऑफिसरसाठी वयोमर्यदा 26 ते 32 पर्यंत आहे.

अशाप्रकारे करा Bank of Maharashtra recruitment 2022 मध्ये अर्ज

  • बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in वर जा.
  • त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
  • होम पेज ओपन झाल्यावर रिक्रूटमेंट प्रोसेसवर क्लिक करा आणि नंतर करंट ओपनिंगवर क्लिक करा.
  • त्यानंतर उमेदवार अर्ज या पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक ती सर्व माहिती भरा.
  • आता अर्ज शुल्क भरा.
  • फॉर्म सबमिट करा.
  • त्यानंतर फॉर्म डाउनलोड करा.
  • शेवटी भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here