भारतीय टेलीकॉम सेक्टर मधील तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑपरेटर Vodafone-idea (Vi) नं आपल्या प्रीपेड युजर्सना खुश करते गुपचूप दोन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीनं आपल्या वेबसाइटवर Rs 2999 आणि Rs 2899 चे प्लॅन लिस्ट केले आहेत. जर तुम्ही देखील वोडाफोन आयडिया प्रीपेड युजर्स असाल तर या प्लॅननं रिचार्ज करून अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि अनेक शानदार बेनिफिट्सचा लाभ घेता येईल. चला पुढे जाणून या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची माहिती.
Vi चा 2,999 रुपयांचा प्लॅन
या प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर हा Vodafone Idea च्या एक वर्षांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन्सच्या पोर्टफोलियोमध्ये आला आहे. या प्लॅनमध्ये एकूण 12 महीने म्हणजे 365 दिवसांची वैधता मिळेल. तसेच Vi 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 850GB 4G डेटा दिला जात आहे जो डेली डेटा लिमिटविना मिळतो. दिवसाला सरासरी 2GB डेटा जरी वापरला तरी हा डेटा सहज पुरेल. तसेच जर तुम्ही रात्री 12 ते 6 दरम्यान जो डेटा वापरला तो प्लॅनमधील डेटा मधून कमी केला जाणार नाही, कारण रिचार्जमध्ये ग्राहकांना रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा मोफत मिळेल. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबतच डेली 100 SMS दिले जात आहेत. हे देखील वाचा: Kantara Hindi OTT: हिंदीतून घेता येणार कांताराचा अभूतपूर्व अनुभव; रिलीज डेट आली समोर
Vi चा 2899 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea चा 2899 रुपयांचा प्लॅन देखील 12 महिन्यांच्या वैधतेसह येतो. या रिचार्जमध्ये ग्राहकांना 365 दिवस रोज 1.5GB डेटा मिळेल. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS मिळत राहतील. या रिचार्जमध्ये देखील रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटाचा लाभ दिला जाईल. इतकेच नव्हे तर या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर प्लॅन आहे. एवढा डेटा कमी पडला तर दर महिन्याला 2GB बॅकअप डेटा देखील कंपनी देत आहे.
Vi चा 3099 रुपयांचा प्लॅन
या दोन्ही प्लॅन व्यतिरिक्त कंपनीकडे आणखी एक रिचार्ज आहे जो 12 महिन्याच्या वैधतेसह येतो. या दोन्ही प्लॅन्स व्यतिरिक्त Vi कडे 3,099 रुपयांचा प्लॅन आहे जो 365 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लॅनमध्ये मिळणारे लाभ पाहता यात डेली 2GB डेटा ग्राहकांना मिळेल. तसेच या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधेसह एक वर्षाचे डिज्नी+ हॉटस्टार मोबाइस सब्सक्रिप्शन देखील देण्यात आलं आहे. हे देखील वाचा: एमआरपीपेक्षा 11000 रुपयांनी स्वस्तात मिळतोय Redmi चा जबरदस्त 5G Phone; अशी ऑफर पुन्हा नाही
नवीन रोमिंग प्लॅन्स
कंपनीनं अलीकडेच कतारमध्ये सुरु असलेल्या फीफा विश्व कप 2022 साठी चार नवीन अंतरराष्ट्रीय रोमिंग (आयआर) प्लॅन लाँच केले होते. यात 2999 रुपये, 3999 रुपये, 4499 रुपये आणि 5999 रुपयांच्या Plan चा समावेश आहे. या सर्व प्लॅन्समध्ये अंतरराष्ट्रीय रोमिंग कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरातसह काही देशांमध्ये लागू आहेत.