Exclusive: itel घेऊन येत आहे रंग बदलणारा स्मार्टफोन, Color Pro 5G नावाने होईल लाँच

आयटेलने आतापर्यंत भारतीय युजर्सना अनेक स्वस्त स्मार्टफोन दिले आहेत. यातच आता itel Color Pro 5G फोन भारतात लाँच होणार आहे. हे पहिल्यांदा असेल जेव्हा आयटेल ब्रँड यासारखी टेक्नॉलॉजी आपल्या फोनमध्ये प्रदान करेल. चला, पुढे तुम्हाला या अफोर्डेबल कलर चेजिंग स्मार्टफोनची एक्सक्लूसिव्ह माहिती सांगतो.

itel Color Pro 5G

  • Itel Color Pro 5G स्मार्टफोन बाबत एक्सक्लूसिव्ह माहिती 91 मोबाईलला इंडस्ट्री सूत्रांकडून मिळाली आहे.
  • सांगण्यात आले आहे की ब्रँडचा नवीन Color Pro 5G स्मार्टफोन IVCO (आयटेल विविद कलर टेक्नॉलॉजी) सह येणार आहे.
  • आयटेल विविद कलर टेक्नॉलॉजीच्या मदतीने सूर्यप्रकाश पडल्यावर या मोबाईलचा बॅक पॅनलचा कलर बदलेल. याआधी ही टेक्नॉलॉजी विवो आणि ओप्पोसह काही इतर ब्रँडच्या फोनमध्ये दिसली आहे.

सूत्रों नुसार नवीन आयटेल कलर प्रो 5 जी स्मार्टफोन लो बजेट सेग्मेट मध्ये आणला जाईल ज्याची प्रारंभिक किंमत 12 ते 15 हजार रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते.

itel P55 5G चे स्पेसिफिकेशन आणि किंमत

पूर्व मध्ये ब्रँडने itel P55 5G लाँच केला होता. ज्याला भारतीय युजर्सने चांगला प्रतिसाद दिला आहे. ज्याबद्दल तुम्ही पुढे वाचू शकता.

  • डिस्प्ले: itel P55 5G फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो.
  • चिपसेट: मोबाईलमध्ये परफॉरमेंससाठी मीडियाटेक डायमेंसिटी 6080 ऑक्टाकोर प्रोसेसर लावला आहे.
    स्टोरेज: मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीमुळे फोनमध्ये 6 जीबी पर्यंत वचुर्अल रॅमसह येतो. तर यात 6GB सामान्य रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज आहे.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी हा आयटेल फोन 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि 5,000 एमएएच बॅटरीसह आहे.
  • किंमत: आयटेल पी 55 5 जी च्या 6GB रॅम + 128GB मेमरी ऑप्शनची किंमत 10,499 रुपये आहे. हा तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर Mint Green आणि Galaxy Blue सारख्या कलरमध्ये मिळेल.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here