Exclusive: Realme TV होईल वर्षाच्या शेवटी लॉन्च, भारतात शाओमीला मात देण्याची तयारी

स्मार्टफोन मार्केट मध्ये थोड्या कालावधीत आपली जागा बनवणारी कंपनी Realme आता स्मार्ट टीवी मार्केट मध्ये प्रवेश करणार आहे. 91mobiles ला इंडस्ट्री सोर्स कडून अशी माहिती मिळाली आहे कि कंपनी या वर्षाच्या शेवटपर्यंत भारतीय मार्केट मध्ये आपला पहिला टीवी लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. अलीकडेच OnePlus ने पण टीवी मार्केट मध्ये पाऊल टाकले आहे.

भारतात स्मार्ट टीवी मार्केट मध्ये शाओमी ऍक्टिव्ह आहे. स्मार्टफोन मार्केट मध्ये अनेक रेकॉर्ड करणारी शाओमी अनेक दिवसांपासून स्मार्ट टीवी सेगमेंट मध्ये पण स्वतःला सिद्ध करत आहे. विशेष म्हणजे स्वस्तात प्रीमियम फीचर्स देणाऱ्या Mi TV शी Realme च्या स्मार्ट टीवीची टक्कर होईल कारण आम्हाला आशा आहे कि फोन प्रमाणे कंपनी आपली स्मार्ट टीवी अफोर्डेबल सेगमेंट मध्ये सादर करेल.

Xiaomi Mi TV

Xiaomi च्या टीवी बद्दल बोलायचे तर भारतात कंपनीचा 32-इंच मॉडेल (बजट कॅटगरी) टीवी पासून 65-इंच साइज पर्यंतचे प्रीमियम स्मार्ट टीवी मार्केट मध्ये उपलब्द आहेत. आम्हाला रियलमीच्या अपकमिंग स्मार्ट टीवीच्या साइजची माहिती मिळाली नाही.

विशेष म्हणजे Realme स्मार्टफोन आणि ऍक्सेसरीज मार्केट मध्ये यशस्वी झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या आगामी टीवी कसून पण अपेक्षा आहे कि ती चांगले प्रदर्शन करेल. तसेच कंपनी यावर्षी डिसेंबर मध्ये आपला Realme X2 Pro स्मार्टफोन डिसेंबर मध्ये लॉन्च करणार आहे, ज्याची माहिती स्वतः कंपनीने दिली आहे. कंपनीने फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here