शाओमीचा सब ब्रँड रेडमी येत्या काही आठवड्यात आपल्या ए-सीरीजचा विस्तार करू शकतो. यानुसार नवीन मोबाईल Redmi A3 Pro भारतासह ग्लोबल बाजारात लाँच असण्याची शक्यता आहे. याला सध्या हायपर ओएस कोड वर स्पॉट करण्यात आले आहे. सांगण्यात आले आहे की स्मार्टफोनमध्ये दमदार स्पेसिफिकेशन स्वस्त किंमतीत मिळू शकतात. चला, पुढे लिस्टिंग आणि इतर गोष्टी सविस्तर जाणून घेऊया.
Redmi A3 Pro माहिती (लीक)
- शाओमी टाईमने Redmi A3 Pro ला हायपर ओएस कोडवर मॉडेल नंबर 2409BRN2CG सह दिसला आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या फोटो मध्ये पाहू शकता की अगामी रेडमी ए 3 प्रो चे कोडनेम Pond आहे.
- या प्लॅटफॉर्मवर स्पेसिफिकेशनची माहिती नाही, मात्र बोलले जात आहे की Redmi A3 Pro काही दिवसांपूर्वी जागतिक स्तरावर लाँच केलेल्या Redmi 14C सारखा असू शकतो.
- लीकनुसार Redmi A3 Pro मोबाईलमध्ये पूर्वच्या ए-सीरीज फोनपेक्षा जास्त शक्तीशाली मिड-टू-लोअर-अँड चिपसेट मिळू शकतो.
- दमदार चिपसेट अपग्रेडने ग्राहकांना स्मूद आणि चांगला एक्सपीरियंस मिळण्याची शक्यता आहे.
- कॅमेऱ्याबद्दल माहिती आहे की डिव्हाईसमध्ये 13MP चा प्रायमरी लेन्स दिली जाऊ शकते.
Redmi A3 Pro किंमत (लीक)
वरती दिलेल्या माहितीससह लीकमध्ये Redmi A3 Pro च्या किंमतीचा पण उल्लेख झाला आहे. सांगण्यात आले आहे की नवीन मोबाईल बाजारात स्वस्त किंमतीमध्ये एंट्री घेईल. अंदाज आहे की याची किंमत जवळपास 10,000 रुपये ठेवली जाऊ शकते. तसेच, पाहायचे आहे की येत्या दिवसांमध्ये ब्रँडकडून कोणती अधिकृत अपडेट येते.
Redmi 14C चे स्पेसिफिकेशन
आगामी Redmi A3 Pro मध्ये Redmi 14C सारखे स्पेक्स मिळू शकतात. यामुळे आम्ही तुम्हाला पुढे याची माहिती देत आहेत.
- डिस्प्ले: Redmi 14C मध्ये 6.88 इंचाचा मोठा HD+ डिस्प्ले आहे. यावर 1600 x 720 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो.
- चिपसेट: स्मार्टफोनमध्ये परफॉरमेंससाठी ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो G81 अल्ट्रा प्रोसेसर देण्यात आला आहे.
- स्टोरेज आणि रॅम: Redmi 14C स्मार्टफोन 4GB, 6GB, 8GB LPDDR4X RAM सह 128GB आणि 256GB eMMC 5.1 इंटरनल स्टोरेजसह येतो.
- कॅमेरा: फोनमध्ये ग्राहकांना f/1.8 अपर्चरसह 50MP चा रिअर प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: Redmi 14C मध्ये युजर्सना 5160mAh ची मोठी बॅटरी मिळते. याला चार्ज करण्यासाठी 18W चार्जिंगचा सपोर्ट आहे.














