इंडियन कंपनीने लॉन्च केले तीन नवीन फोन, किंमत फक्त 4,999 रुपयांपासून सुरु, कोणताही पार्ट नाही चायनीज

देशात “Made In India” स्मार्टफोन्सची मागणी वाढत असताना मोबाईल बाजारात अजून एका टेक कंपनीने एंट्री घेतली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये Micromax आणि Lava सारख्या ब्रँड्सने आपले नवीन स्मार्टफोन घेऊन आले आहेत तर आता इंडियन टेक फर्म FESSChain ने भारतीय बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची घोषणा केली आहे. फेसचेनने Inblock ब्रँड अंतगर्त एक साथ तीन नवीन BlockChain स्मार्टफोन Inblock E10, E12 आणि E15 लॉन्च केले आहेत.

सर्वप्रथम सांगायचे तर हे भारतातील पहिले ब्लॉकचेन स्मार्टफोन आहेत. ब्लॉकचेन एक डिसेंट्रलाइज डिजीटल लेजर आहे जी ट्रांसजेक्शन्स इत्यादी अश्या क्रमबद्ध पद्धतीने सेव करते ज्यामुळे त्यांना हॅक करणे कठीण अश्यक होते. म्हणजे इनब्लॉक ब्रँडचे हे स्मार्टफोन पूर्णपणे सिक्योर आणि सुरक्षित आहेत ज्यात युजर डेटा चोरटा येणार नाही. कंपनीने म्हटले आहे कि हे तिन्ही स्मार्टफोन ‘आत्मनिर्भर भारत’ कँपेन अंतगर्त लॉन्च केले गेले आहेत.

कमी किंमतीत कमाल

किंमत पाहता Inblock E10 सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 1 जीबी रॅम सह 16 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 4,999 रुपये आहे. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 2 जीबी रॅम + 16 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 5,999 रुपये आहे.

Inblock E10 चा सर्वात मोठा वेरिएंट 3 जीबी रॅम सह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो फक्त 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Inblock E12 पाहता हा स्मार्टफोन कंपनीने 7,450 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच Inblock E15 स्मार्टफोन ब्रँडचा सर्वात महाग फोन आहे पण याच्या बेस वेरिएंटची किंमत 8,600 रुपये तर सर्वात मोठ्या वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. ब्रँडचे सर्व स्मार्टफोन साल 2021 मध्ये 1 जानेवारी पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्म वर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

हे देखील वाचा : या देशी स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला महिलांसाठी खास फोन BeU, किंमत फक्त 6,888 रुपये

शानदार फीचर्स

कंपनीने सध्या या तिन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स बाबत माहिती दिली नाही. पण सांगण्यात आले आहे कि हे तिन्ही InBlock स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केले जातील. फोन मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ऑटोफोकस कॅमेरा सारखे फीचर्स मिळतील तसेच यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. सांगण्यात आले आहे कि इनब्लॉक स्मार्टफोन्स मध्ये डिजिटल ट्रेडिंग, एक्सचेंज आणि वॉलेट्ससाठी वन-स्टॉप ऍक्सेस मिळेल ज्यामुळे डिजिटल ट्रांजेक्शन अजून जास्त सिक्योर होतील.

बिघडल्यावर मिळेल नवीन फोन

कंपनीचा दावा आहे कि Inblock स्मार्टफोन मध्ये युजर्सना जर कोणताही बिघाड आला तर ते त्याला सर्विस सेंटरवर नेण्याची गरज नाही उलट सर्विस टीम स्वतःहून ग्राहकांच्या घरी येऊन तो फोन दुरुस्त करतील. कंपनीच्या मते या स्मार्टफोन्सच्या निर्मितीत कोणत्याही चीनी पार्टचा वापर केला गेला नाही तसेच फोनचे सर्व पार्ट्स दुबई मागवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here