वनप्लसच्या तोडीचा स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत; नुकताच आलेला Redmi K50i स्वस्तात खरेदी करण्याची संधी

वाढती स्पर्धा पाहून Xiaomi नं कालच भारतात आपली रेडमी के सीरिज दोन वर्षानंतर पुन्हा सादर केली आहे. रेडमी ब्रँड अंतगर्त नवीन 5G Phone Redmi K50i लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6GB RAM, Mediatek Dimensity 8100 चिपसेट, 64MP Camera आणि 67W 5080mAh Battery सारख्या शक्तिशाली स्पेसिफिकेशन्ससह येतो. रेडमी के50आय भारतात 25,999 रुपयांच्या बेस किंमतीत लाँच झाला आहे परंतु शाओमी फॅन हा नवीन 5जी फोन फक्त 12,449 रुपयांमध्ये देखील विकत घेऊ शकतील. कंपनीनं आपल्या मोबाईल युजर्ससाठी खूप शानदार ऑफर सादर केली आहे जिच्यामुळे Redmi K50i च्या किंमतीवर 13,550 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

Redmi K50i डिस्काउंट ऑफर

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो रेडमी के50आयची विक्री ई-कॉमर्स साइट Amazon वर केली जाईल, जिथे या फोनची किंमत 25,999 रुपये आहे. परंतु एक्सचेंज ऑफर अंतगर्त कंपनी रेडमी के20 प्रो स्मार्टफोनवर थेट 8,050 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ही एक Exchange Offer आहे जी स्पेशल Redmi K20 Pro युजर्ससाठी आणण्यात आली आहे. म्हणजे जर तुम्ही सध्या Redmi K20 Pro स्मार्टफोन वापरत असाल तर नवीन Redmi K50i च्या खरेदीवर तुम्हाला 8 हजार 50 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

फक्त इतकेच नव्हे तर जुना रेडमी के20 प्रो दिल्यावर 8,050 रुपयांच्या डिस्काउंट सोबतच ग्राहकांना 2,500 रुपयांचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. तसेच Redmi early-bird offer अंतगर्त 3,000 रुपयांची सूट देखील मिळेल. हा तीन हजार रुपयांचा डिस्काउंट आयसीआयसीआय बँकेचं कार्ड वापरल्यावर मिळेल.

Redmi K50i च्या 6GB RAM + 128GB Storage मॉडेलची किंमत 25,999 रुपये आहे परंतु वरील डिस्काउंट्सची बेरीज केल्यास 8050 + 2500 + 3000 = 13550 रुपयांची थेट सूट रेडमी के50आय स्मार्टफोनवर मिळत आहे. या बंपर डिस्काउंट नंतर रेडमी के50आय स्मार्टफोनची किंमत 25,999 रुपयांवरून फक्त 12,449 रुपये होईल. तसेच हा फोन 2,555.4 रुपयांच्या 9 महिन्यांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेता येईल.

Redmi K50i चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 270Hz आहे. हा डिस्प्ले Dolby Vision, 650 निट्स ब्राईटनेस आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. कंपनीनं डिस्प्लेला Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा दिली आहे. कनेक्टिव्हिटी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, IR ब्लास्टर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, Dolby Atoms, आणि लिक्विड कूलिंग 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आला आहे.

हा फोन Android 12 आधारित MIUI वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 चिपसेटची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबतीला 8GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा आहे जो Samsung GW1 सेन्सर आहे. प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. रेडमीच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यातील 5,080mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here