Android Q झाला आहे रिलीज, जाणून घ्या कसा करावा आपल्या फोन मध्ये सर्वात आधी इंस्टाल

टेक दिग्गज गूगल ने कालच आपला सर्वात मोठा वार्षिक समारोह Google I/O 2019 सुरु केला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण संपूर्ण जगातील टेक प्रेमी इया ईवेंटची वाट बघत होते. अमेरिकेतील सॅन फ्रांस्सिको मध्ये आयोजित या ईवेंटच्या पहिल्याच दिवशी गूगल ने नवीन पिक्सल स्मार्टफोन Pixel 3a आणि Pixel 3a XL लॉन्च केला आहेत. पिक्सल फोन सोबत गूगल ने एंडरॉयडची सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम Android Q पण ग्लोबली रिलीज करण्याची घोषणा केली आहे. 21 स्मार्टफोन्स वर Android 10 म्हणजे Android Q अपडेट करता येईल.

Google ने Android Q चा बीटा वर्जन आफिशियली रिलीज केला आहे. Google I/O 2019 मध्ये गूगल ने घोषणा केली आहे कि गूगलच्या पिक्सल फोन मध्ये एंडरॉयड 10 चा नवीन अपडेट आज पासून मिळेल तसेच येत्या काही दिवसांत इतर स्मार्टफोन ब्रांड्स पण आपल्या डिवाईस वर हा वर्जन अपडेट करू शकतील. विशेष म्हणजे गूगल Android Q चा बीटा वर्जन आधीच सादर केला गेला आहे पण काल Google I/O 2019 मध्ये कंपनी ने या ओएसचा लेटेस्ट Android Q beta 3 अपडेट जारी केला आहे.

विशेष म्हणजे Android Q beta 3 वर्जन फक्त डेवलेपर्स नव्हे तर सामान्य स्मार्टफोन यूजर्स साठी पण आहे. गूगलने 21 स्मार्टफोन्सची यादी शेयर केली आहे ज्यांना इतारांच्या आधी नवीन एंडरॉयड ओएस अपडेट मिळेल. Android Q beta 3 वर्जन OTA म्हणजे ओवर द एयर सोबत System Image Flash द्वारे पण डाउनलोड केला जाऊ शकतो.

जर तुम्हाला त्या 21 स्मार्टफोन्सची ज्यांना Android Q beta 3 अपडेट मिळाला आहे त्यांची यादी हवी असेल, तर इथे क्लिक करा

चेक करा Android Q चा नवा अपडेट
सर्वात आधी ओटीए द्वारे तुमच्या फोन मध्ये Android Q beta 3 चा अपडेट उपलब्ध आहे कि नाही ते बघा. त्यासाठी :
1. स्मार्टफोनची सेटिंग्स ओपेन करा आणि तिथे ‘सिस्टम’ ऑप्शन वर क्लिक करा
2. सिस्टम मध्ये ‘अबाउट फोन’ चा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा
3. तिथे सर्वात खाली ‘एंडरॉयड वर्जन’ मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर समजेल कि तुमच्या फोन मध्ये कोणता एंडरॉयड वर्जन चालू आहे.
4. ‘अबाउट फोन’ मध्येच एंडरॉयड सिक्योरिटी पॅचचा ऑप्शन देण्यात आला आहे, त्यावर क्लिक करा.
5. जर तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड क्यू चा अपडेट उपलब्ध असेल तर डाउनलोड एंड इंस्टालचा ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करा.

असा करा Android Q वर अपडेट
1. ‘अबाउट फोन’ मध्ये जर Android Q अपडेट OTA द्वारे आला असेल तर या फोन मध्ये डाउनलोड करा.
2. गूगलने खास सांगितले आहे कि Android Q वर फोन अपडेट कारण्याआधी फोनचा बॅकअप जरूर घ्या.
3. तसेच नवीन एंडरॉयड वर्जनची फाइल साईज 1 जीबी पेक्षा जास्त असू शकते, त्यामुळे फोन वाईफाई शी कनेक्ट केला तर उत्तम.
4. डाउनलोड एंड इंस्टाल वर टॅप करा, नवा अपडेट डाउनलोड होण्यास सुरु होईल.

अशी करा सिस्टम ईमेज डाउनलोड Android Q
जर तुमच्या फोन मध्ये Android Q beta 3 चा OTA अपडेट आला नसला तर या नवीन ओएस ची System Image आपल्या फोन मध्ये इंस्टाल करून एंडरॉयड क्यू वर पण अपडेट करु शकता. त्यासाठी :

1. developer.android.com वेबसाइट वर जाऊन Android Studio सेग्मेंट उघड आणि SDK Manager वर क्लिक करा
2. तिथे तुम्हाला Android Q Beta चे पॅकेज मिळेल, त्यात सिस्टम ईमेज निवडा. जी Google APIs Intel x86 Atom System Image नावाने मिळेल.
3. एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट वर्जनची फाईल सिलेक्ट करा, ती इंस्टाल व्हायला सुरवात होईल.
4. सिस्टम ईमेज डाउनलोड झाल्यानंतर टूल्स मधील AVD Manager मध्ये जाऊन नवीन AVD बनावा.
5. नवीन AVD फाईल डबल क्लिक करा, हि फ्लॅश ईमेज इंस्टाल होण्यास सुरु होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here