Nokia घेऊन येत आहे तीन नवीन स्मार्टफोन, 19 मार्चला होतील लॉन्च

Nokia ब्रँडचे फोन बनवणाऱ्या HMD Global चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर जुहो सर्विकास यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी 19 मार्चला लंडन मध्ये एका इवेंटचे आयोजन करणार आहे. पण या इवेंट मध्ये कोणते डिवाइस सादर केले जातील याची माहिती देण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे नोकियाचा इवेंट MWC 2020 मध्ये होणार होता. पण कोरोना वायरसमुळे हि कॉन्फ्रेंस रद्द करण्यात आली आहे. बर्सिलोना मध्ये आयोजित होणाऱ्या या इवेंट मध्ये कंपनी Nokia 8.2 5G, Nokia 5.2 आणि Nokia 1.3 पण सादर करण्याची शक्यता होती. आता कंपनी लंडन मध्ये हेच डिवाइस सादर करू शकते.

MWC 2020 मध्ये आपला इवेंट रद्द करताना HMD Global ने खुलासा केला होता कि ते आपल्या प्रोडक्टची घोषणा लवकरच करेल, ज्याची घोषणा आज करण्यात आली आहे. जुहो सर्विकास यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून 9 सेकंदांचा एक वीडियो शेयर केला आहे. या वीडियो मध्ये लॉन्च डेट आणि लंडन व्यतिरिक्त इतर कोणताही उल्लेख नाही.

आधीच माहिती समोर आली होती कि Nokia आगामी स्मार्टफोन Nokia 8.2 स्मार्टफोन फक्त 5G कनेक्टिविटी सोबत लॉन्च करेल तसेच Nokia 8.2 मध्ये 4G सपोर्ट दिला जाणार नाही. पुढे तुम्हाला Nokia 1.3, Nokia 5.2 आणि Nokia 8.2 5G स्मार्टफोनच्या किंमतीची आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देत आहोत.

Nokia 8.2 5G स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

किंमत पाहता Nokia 8.2 5G कंपनी 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सह सादर करेल. तसेच डिवाइसचा लिमिटेड एडिशन 8 GB रॅम आणि 128 GB / 256 GB स्टोरेज सह सादर करेल. फोनच्या बेस मॉडेलची किंमत जवळपास 30,000 रुपये असेल.

स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 765 प्रोसेसर दिला जाईल जो 5जी मॉडेम सह येईल. तसेच कॅमेरा मॉड्यूलची डिजाइन आणि सेटअप नोकिया 7.2 प्रमाणे असेल. फोन मध्ये 32MP चा फ्रंट पॉप-अप कॅमेरा असेल. कंपनी डिवाइस मध्ये pOLED आणि LCD डिस्प्ले पैकी काय देईल हे अजून स्पष्ट झाले नाही. पण सोर्सनुसार हँडसेट मध्ये पावर बॅकअपसाठी 3500 mAh आणि 3.5mm हेडफोन जॅक असेल.

Nokia 1.3

कंपनी नवीन Nokia 1.3 LCD स्क्रीन (जवळपास 6-इंच) यू शेप आणि टियर ड्रॉप नॉच सह सादर करेल. तसेच डिवाइस मध्ये 1 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोन मध्ये फोटोग्राफीसाठी 13MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4000 mAh ची बॅटरी दिली जाईल. Nokia 2.3 मध्ये 3D नॅनो-स्टेक्चर प्लास्टिक कवर असेल. रिपोर्टनुसार फोन जवळपास 6,200 रुपयांमध्ये सादर होईल.

Nokia 5.2

कंपनी Nokia 5.2 3+32 GB आणि 4+64 GB सह सादर करेल. फोनच्या कॅमेरा मॉड्यूलची डिजाइन 6.2 सारखी असेल. फोनच्या मागे 16+8MP कॅमेरा असेल. तसेच सेल्फीसाठी डिवाइस मध्ये 8 MP चा कॅमेरा आणि पावर बॅकअपसाठी 3500 mAh ची बॅटरी असेल. फोन 6.2-LCD स्क्रीन आणि स्नॅपड्रॅगॉन 632 प्रोसेसर सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन जवळपास 13,000 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here