लॉन्चच्या आधी आली गूगल पिक्सल 3ए आणि 3ए एक्सएल ची किंमत, बघा किती स्टाइलिश आहे हा फोन

सर्च इंजन कंपनी गूगल पहिल्यांदा आपल्या पिक्सल सीरीज मध्ये स्वस्त स्मार्टफोन लॉन्च कारण्याची तयारी करत आहे. हे दोन्ही डिवाइस कंपनी मार्केट मध्ये पिक्सल 3ए आणि 3ए एक्सएल नावाने सादर करेल, ज्याबद्दल काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती. हे आगामी स्मार्टफोन मॉडेल्स गूगल द्वारा पिक्सल स्मार्टफोन पेक्षा कमी किंमतीत लॉन्च केले जातील.

जर्मन टेक ब्लॉग विनफ्यूचरला यूरोपियन ऑनलाइन रिटेलर्स कडून याची माहिती मिळाली आहे कि दोन्ही फोन पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल नावाने सादर केले जातील. तसेच यात 64जीबी इंटरनल स्टोरेज असेल. पण रिपोर्ट मध्ये स्टोरेज वाढवण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

हे देखील वाचा: कशाप्रकारे करावा आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट आणि जाणून घ्या शुल्क

रिपोर्ट मध्ये अशी माहिती समोर आली आहे कि फोन ब्लॅक आणि वाइट कलर वेरीएंट मध्ये सादर केला जाईल. तसेच तिसरा वेरीएंट आईरिस नावाने समोर येईल. बोलले जात आहे कि तिसरा कलर ब्लू आणि वॉयलेटचे कॉम्बिनेशन असेल. तसेच पिक्सल 3ए च्या किंमतीचा खुलासा झाला आहे, जी €450 (जवळपास 34,950 रुपये) असेल. तसेच पिक्सल 3ए एक्सएल थोड्या जास्त किंमतीत लॉन्च केला जाईल.

आतापर्यंत समोर आलेला माहितीनुसार पिक्सल 3ए एक्सएल 4जीबी रॅम सह येईल. गीकबेंच लिस्टिंग मधून समजले आहे कि गूगल पिक्सल 3ए एक्सएल एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच या फोन मध्ये 1.71गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. तसेच गीकबेंच ने स्पष्ट केले आहे कि पिक्सल 3ए एक्सएल मधे क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन चिपसेट दिला जाईल.

हे देखील वाचा: सॅमसंगला चोख उत्तर देण्यासाठी तयार आहे शाओमी, लवकरच येत आहे फोल्डेबल फोन

काही दिवसांपूर्वी गूगल पिक्सलच्या फोर्थ जनरेशन हँडसेट पिक्सल 4 बद्दल माहिती समोर आली होती. गूगल पिक्सल 4 मध्ये फ्रंटला पण डुअल कॅमेरा सेटअप असू शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये पंचहोल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पंचहोल डिस्प्ले आपण आतापर्यंत हॉनर आणि सॅमसंगच्या फोन मध्ये बघितला आहे. पण लीक इमेज मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत नाही. आशा आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फोन फिंगरप्रिंट सेंसर असेल. याआधी हा स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला होता. गीकबेंच वर गूगल पिक्सल 4 ने सिंगल कोर टेस्ट मध्ये 744 आणि मल्टिकोर टेस्ट मध्ये 3201 प्वाइंट्स स्कोर मिळवले होते.

सोर्स

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here