कशाप्रकारे करावा आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट आणि जाणून घ्या शुल्क

ओळखपत्र दाखवायचे असेल किंवा पुरावा म्हणून वापरायचा असेल तर जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तुम्ही सहज हि कामे करू शकता. परंतु सर्वात जास्त त्रास लोकांना आधार कार्डच्या डेटा पासूनच होतो. तसे पाहता लोकांना आधीच सरकारी कामात चुका होतील याची अपेक्षा असते आणि त्या नंतर सुधारव्या लागतील. परंतु अनेकदा पत्ता बदलणे, मोबाईल नंबर बदलणे आणि लग्नानंतर नाव बदलताना त्रास होतोच. पण महत्वाची बाब अशी कि अनेक गोष्टी तुम्ही घर बसल्या बदलू शकता. आज मी तुम्हाला आधार कार्ड संबंधित अशाच समस्यांची उत्तरे देणार.

प्रश्न 1. आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करावा?
आधार कार्ड मध्ये आधी मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु आता काढून टाकण्यात आला आहे. जर तुमच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर जोडलेला नसेल किंवा तुम्ही आपला मोबाईल नंबर बदलू इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्र वरच जावे लागेल. ऑनलाइन हि सुविधा उपलब्ध नाही.

प्रश्न 2. आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याचे शुल्क किती?
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला 25 रुपये शुल्क द्यावे लागेल.

प्रश्न 3. किती वेळात मोबाईल नंबर होईल अपडेट?
मोबाईल नंबर अपडेट होण्यास 90 दिवसांचा वेळ लागू शकतो.

प्रश्न 4. आधार कार्ड मध्ये ऑनलाइन एड्रेस अपडेट कसा करावा?
तुमच्या आधार कार्ड मध्ये तुम्ही एड्रेस ऑनलाइन अपडेट करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. पण एड्रेस अपडेट करण्यासाठी तुमच्या आधार नंबर सोबत मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर अपडेट नसेल तर मग अपडेट होऊ शकणर नाही. एड्रेस अपडेट करण्यासाठी

1. सर्वात आधी आधार सेल्फ सर्विस पोर्टल वर जा.

2. तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील परंतु पत्ता बदलण्यासाठी अपडेट एड्रेस वर क्लिक करा.

3. असे करताच एक नवीन विंडो उघडेल. तुम्ही https://ssup.uidai.gov.in/web/guest/aadhaar-home ने थेट एड्रेस अपडेट वर जाऊ शकता.

4. तिथे खाली तुम्हाला एड्रेस अपडेटचा पर्याय मिळेल. तो क्लिक करा. तिथून नवीन विंडो उघडेल आणि सर्वात आधी 12 डिजिट वाला आधार नंबर टाकावा लागेल.

5. त्याखाली कॅपचा येईल तो टाकून सेंट ओटीपी ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फोन वर एक ओटीपी येईल.

6. ओटीपी टाकताच तुम्ही एड्रेस सुधार पोर्टल वर पोहचाल. तिथे तुमच्या समोर दोन पर्याय असतील. पहिला एड्रेस अपडेट करण्यासाठी आणि दुसरा एड्रेस वॅलिडेशन लेटर साठी तुम्हाला पहिल्या पर्याय वर क्लिक करायची आहे आणि खाली सबमिट करायचे आहे.

7. असे करताच नवीन एड्रेस टाकण्याचा पर्याय तुमच्या समोर येईल. तुमची संपूर्ण माहिती सविस्तर भरा. नंतर पडताळणी करून सबमिट करा.

8. त्यानंतर तुम्हाला कोणता डाक्यूमेंट तुम्ही एड्रेस प्रूफ मध्ये देणार आहात ते निवडावे लागेल. जसे कि- पासपोर्ट, वोटर कार्ड आणि राशन कार्ड इत्यादी. निवड केल्यानंतर तुमचा डॉक्यूमेंट सबमिट करा.

9. सबमिट करताच तुमच्या समोर ऑप्शन येईल कि बीपीओ सर्विस प्रोवाइडर डाक्यूमेंटची तपासणी करेल आणि तिथे पण तुम्हाला सबमिट करायचे आहे. असे करताच प्रक्रिया पूर्ण होईल.

10. आता तुम्हाला एक यूआरएन नंबर दिला जाईल. हा यूआरएन नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ज्याने तुम्ही तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकाल आणि एड्रेस अपडेट बघू शकला.

प्रश्न 5. आधार कार्ड मध्ये काय करता येईल ऑनलाइन अपडेट?
आधार कार्ड मध्ये तुम्ही फक्त एड्रेस अपडेट करू शकता आणि एड्रेस वॅलिडेशन लेटर अपडेट करू शकता. याव्यतिरिक्त काही नाही.

प्रश्न 6. आधार कार्ड मध्ये ऑनलाइन काय नाही करता येत अपडेट?
आधार कार्ड मध्ये तुम्ही नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी सहित इतर गोष्टी स्वतःहून अपडेट करू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here