अनेक दिवसांपासून चर्चा होती कि गूगल पिक्सल सीरीज वाढवणार आहे आणि या अंतर्गत स्वस्त पिक्सल फोन लॉन्च केले जातील. या नवीन पिक्सल फोन्सची नावे पण समोर आली होती, ज्यांना Pixel 3a आणि Pixel 3a XL नाव देण्यात आले होते. आज सर्व लीक्सना उत्तर देत आणि आपल्या फॅन्सची उत्सुकता शांत करत Google ने नवीन पिक्सल स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने Pixel 3a आणि Pixel 3a XL टेक मंचावर लॉन्च केले आहेत.
गूगलने आज अमेरिकेतील सॅन फ्रांस्सिको मध्ये Google I/O 2019 चे आयोजन केले होते. याच मंचावरून Android Q, Google Assistant आणि टेक विश्वासंबंधित अनेक मोठ्या घोषणां सोबत गूगल ने नवीन पिक्सल स्मार्टफोन Pixel 3a आणि Pixel 3a XL पण लॉन्च केले आहेत. गूगलने हे दोन्ही स्मार्टफोन ग्लोबल मंचावर लॉन्च केले आहेत जे आगामी काही दिवसांत भारतात सेल साठी उपलब्ध होतील. शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विकत घेता येतील.
किंमत
Google Pixel 3a = 39,999
Google Pixel 3a XL = 44,999
डिजाईन
गूगलने नवीन पिक्सल डिवाईस Pixel 3a आणि Pixel 3a XL पिक्सल 3 सारख्या लुक वर सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च झाले आहेत ज्यात कोणतीही नॉच नाही. दोन्ही फोन मॉडेल्स ग्लॉस बॉडी वर सादर करण्यात आले आहेत. डिस्प्लेच्या बाजूचे किनारे बेजल लेस आहेत तर वर आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Pixel 3a आणि Pixel 3a XL सिंगल रियर कॅमेर्याला सपोर्ट करतात ज्यात कॅमेरा सेंसर सोबत फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे.
Pixel 3a आणि Pixel 3a XL दोन्ही मॉडेल्सच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे. तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. हे दोन्ही स्मार्टफोन यूएसबी टाईप सी पोर्टला सपोर्ट करतात जो फोनच्या खालच्या पॅनल वर आहे. यूएसबी पोर्टच्या दोन्ही बाजूंन स्पीकर्स देण्यात आले आहेत. 3.5एमएम आडियो जॅक फोनच्या वरच्या पॅनल वर आहे.
स्पेसिफिकेशन्स
Google ने Pixel 3a 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 2220 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.6-इंचाच्या फुलएचडी+ जीओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच Pixel 3a XL कंपनी द्वारा 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे तसेच या फोन मॉडेल मध्ये 2160 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6-इंचाचा फुलएचडी+ जीओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
Pixel 3a आणि Pixel 3a XL एंडरॉयड 9.0 पाई वर सादर करण्यात आले आहेत जे लवकरच एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड क्यू वर अपडेट होतील हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 64बिट आक्टा-कोर प्रोसेसरला सपोर्ट करतात. सोबत क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट वर चालतात. तसेच ग्राफिक्स साठी या दोन्ही पिक्सल मॉडेल्स मध्ये एड्रेनो 615 जीपीयू देण्यात आला आहे.
Google ने Pixel 3a आणि Pixel 3a XL 4जीबी रॅम सह सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Pixel 3a आणि Pixel 3a XL दोन्ही सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 12.2 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स363 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. अशाप्रकारे सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Pixel 3a आणि Pixel 3a XL मध्ये सिक्योरिटी आणि फोन अनलॉकिंग साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी Pixel 3a मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तर Pixel 3a XL 3,700एमएमएच बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल ने Pixel 3a आणि Pixel 3a XL जस्ट ब्लॅक आणि क्लीयर वाईट कलर मध्ये लॉन्च केले आहेत.
प्राइस, लॉन्च तारीख
एक्सपेक्टेड प्राइस: रु. 39,999
रिलीजची तारीख: May 15, 2019 (अनौपचारिक)
वेरियंट: 4 जीबी रॅम / 64 जीबी इंटरनल स्टोरेज
फोनची स्थिती: येणार आहे













