Google Pixel 4 XL चा खरा फोटो आला समोर, 15 ऑक्टोबरला लॉन्च होईल हा प्रीमियम डिवाईस

Google ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 15 ऑक्टोबरला न्यूयॉर्क सिटी मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून पिक्सल सीरीजचा नवीन फोन Pixel 4 आणि Pixel 4 XL लॉन्च केला जाईल . कंपनीने या ईवेंटला Google Event 2019 चे नाव दिले आहे आणि यादिवशी कंपनी पिक्सल स्मार्टफोन्स सोबत Pixelbook 2 आणि Google Home सारखे इतर प्रोडक्ट्स पण लॉन्च करू शकते. हा ईवेंट Made by Google या नावाने प्रमोट केला जात आहे. 15 ऑक्टोबरला लॉन्च होणाऱ्या प्रोडक्ट्स मध्ये ज्याची सर्वात जास्त चर्चा आहे तो आहे Pixel फोन. Pixel 4 आणि Pixel 4 XL बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत आणि आता लॉन्चच्या आधीच Pixel 4 सीरीज स्मार्टफोनचे खरे फोटोज पण इंटरनेट वर वायरल झाले आहेत.

Google Pixel 4 XL चे फोटोज नेक्स्टरिफ्ट द्वारा शेयर केले गेले आहेत. हे हॅंडसॉन फोटोज आहेत ज्यात Pixel 4 XL हातात घेऊन प्रत्येक अँगलने दाखवण्यात आला आहे. लीक झालेल्या फोटोज मध्ये Pixel 4 XL च्या फ्रंट आणि बॅक पॅनल सोबतच साईड पॅनलचे फोटो दाखवण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक आणि डिजाईन सोबत अनेक महत्वाच्या फीचर्सची माहितीचा खुलासा झाला आहे. डिजाईन सोबत असे पण समजले आहे कि Google Pixel 4 XL स्मार्टफोन 90हर्ट्ज डिस्प्ले रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

अशी असेल डिजाईन

Google Pixel 4 XL च्या डिजाईनची सुरवात फोनच्या फ्रंट पॅनल पासून करूया, हा फोन नॉच-लेस डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नाही. Pixel 4 XL दोन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खाली आणि वर बारीक बॉडी पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला असलेल्या बॉडी पार्ट वर स्पीकर देण्यात आला आहे तर बाजूला एक सेल्फी कॅमेरा सेंसर आणि एक फेस रेक्ग्नेशन सेंसर आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये डिस्प्ले राउंड कॉर्नर सह दाखवण्यात आला आहे.

Pixel 4 XL च्या बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर इतर कोणताही सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Google चा लोगो आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे ज्याच्या खाली सिम स्लॉट स्थित आहे. तसेच वॉल्यूम रॉकर फोनच्या डाव्या पॅनल वर देण्यात आला आहे. Google Pixel 4 XL यूएसबी टाईपी सी पोर्टला सपोर्ट करेल.

स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 4 XL च्या फोटोज वरून समजले आहे कि यात ‘Smooth Display’ मोड दिला जाईल ज्यामुळे फोनचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 60हर्ट्ज वरून 90हर्ट्ज पर्यंत होईल. लीक्स नुसार हा स्मार्टफोन 6.23 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. तसेच Pixel 4 मध्ये 5.7 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. बोलले जात आहे कि दोन्ही ही मॉडेल्स मध्ये 3040 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असेलला डिस्प्ले दिला जाईल.

Pixel 4 XL मध्ये 12 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस या फोन मध्ये मिळू शकते. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. पावर बॅकअप साठी Pixel 4 मध्ये 2800एमएएच आणि Pixel 4 XL मध्ये 3700एमएएच ची मोठी बॅटरी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here