1,000 रुपयांनी स्वस्त झाला 4230एमएएच बॅटरी असलेला OPPO A5S, आता मिळेल या नवीन किंमतीत

OPPO ने यावर्षी भारतीय बाजारात आपल्या ‘ए सीरीज’ अंतर्गत OPPO A1K आणि OPPO A5S स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन एप्रिल मध्ये भारतात लॉन्च झाले जे लो बजेट मध्ये सेल साठी उपलब्ध होते. OPPO A5S पाहता कंपनीने हा डिवाईस तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता ज्यात 2 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी, 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरीचा समावेश आहे. गेल्या महिन्यात कंपनीने OPPO A5S च्या 4 जीबी रॅम वेरिएंटच्या किंमतीत 1000 रूपांनी कपात केली होती, तर आता OPPO ने ओपो ए5एस स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत कमी केली आहे.

OPPO A5S च्या या नवीन प्राइज कट बद्दल बोलायचे तर कंपनीने OPPO A5S च्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. हा स्मार्टफोन वेरिएंट कंपनीने 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, पण आता प्राइज कट नंतर हा वेरिएंट फक्त 8,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OPPO A5S ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाइन बाजारात रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध आहे.

फोनच्या इतर वेरिएंट्स बद्दल बोलायचे तर OPPO A5S चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंटची किंमतीत मागे कपातीनंतर हा 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. OPPO A5S मार्केट मध्ये रेड, ब्लॅक, ग्रीन आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

डिजाइन

Oppo A5S कंपनी द्वारा बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत पण खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Oppo A5S डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे हारिजॉन्टल शेप मध्ये आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर मधेच फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन पाहता Oppo A5s 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कपंनीने हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo A5s च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी Oppo A5s मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आणि 4जी एलटीई सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी Oppo A5s 4,230एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here