Google Pixel 4a 5G चे स्पेसिफिकेशन झाले लीक, 30 सप्टेंबरला करू शकतो एंट्री

91mobiles ने अलीकडेच टिप्सटर @OnLeaks सोबत भागेदारी करून अपकमिंग Pixel 4a 5G चे एक्सक्लूसिव CAD-बेस्‍ड रेंडर्स प्रसिद्ध केले होते. अपकमिंग Pixel 4a 5G च्या 5K रेंडर्स सोबत डिजाइन दाखवण्यासाठी आम्ही 360-डिग्री वीडियो पण शेयर केला होता, ज्यामुळे समजले होते कि लुकच्या बाबतीत हा बऱ्याच अंशी नॉन-5G पिक्सल 4a आणि पिक्सल 5 प्रमाणे असेल. तसेच अलीकडेच एक माहिती समोर आली, ज्यात सांगण्यात आले होते कि Google Pixel 4a 5G स्मार्टफोन 30 सप्टेंबरला आयोजित होणाऱ्या वर्चुअल इवेंट मध्ये सादर केला जाईल आणि आता लॉन्चच्या आधी ऑनलाइन लीक मध्ये फोनचे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

स्पेसिफिकेशन्स

WinFuture च्या रिपोर्टनुसार Google Pixel 4a 5G मध्ये 6.2 इंचाच्या फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) ओलेड डिस्प्ले सह 413 पीपीआई पिक्सल डेंसिटी, एचडीआर सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन असेल. तसेच पिक्सल 4ए 5जी फोन स्नॅपड्रॅगॉन 765जी प्रोसेसर सह येईल, जो पिक्सल 5 मध्ये पण होता. पिक्सल 4ए 5जी मध्ये 6 जीबी रॅम दिला जाईल आणि 128 जीबी स्टोरेज असेल.

फोटोग्राफी पाहता पिक्सल 4ए 5जी मध्ये अपर्चर f/1.7 सह 12.2 मेगापिक्सल Sony IMX355 का प्राइमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन (OIS) असेल. तसेच अपर्चर f/2.2 सह 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा 107 डिग्री फील्ड ऑफ व्यू (FOV) असेल. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये अपर्चर f/2.0 सह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल.

गूगल पिक्सल 4ए 5जी मध्ये कथितपणे 3,885 एमएएच बॅटरी दिली जाईल, ज्या सोबत 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. तसेच पिक्सल 4ए 5जी मध्ये पिक्सल 5 प्रमाणे वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगचा सपोर्ट नसेल.

कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून पिक्सल 4ए 5जी फोन मध्ये 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 802.11ac, ब्लूटूथ वी5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनवीन फसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. तसेच पिक्सल 4ए 5जी फोन मध्ये 3.5mm हेडफोन जॅक नसेल. तसेच या फोन मध्ये स्टीरियो स्पीकर दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here