प्रत्येक कंपनी व ब्रँडच्या स्मार्टफोन्सना आपला एंडरॉयड ओएस देणाऱ्या टेक कंपनी Google ने जेव्हा स्वतःचा स्मार्टफोन बाजारात आणला होता, तेव्हा लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण गूगलने आपला टारगेटेड यूजर बेस फ्लॅगशिप सेग्मेंट मधील महागडे मोबाईल्स घेणारा ठेवला. कंपनीने Google Pixel सह सुरवात केली आणि मोबाईल यूजर्सना हा आवडला पण होता. पण आता मिडबजेटचे स्मार्टफोन घेणाऱ्या लोकांसाठी पण गूगल आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे जो Google Pixel 4a नावाने लॉन्च केला जाईल. या फोनचे अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात आता पिक्सल 4ए च्या बॅटरी पावरचा पण खुलासा झाला आहे.
Google Pixel 4a तैवानच्या एनसीसी आणि टीयूवी रेइंलॅन्ड वेबसाइट वर सर्टिफाइड केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला आहे कि गूगल पिक्सल 4ए 18वॉट चार्जरला सपोर्ट करणाऱ्या 3,140एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केला जाईल. या सर्टिफिकेशन्स साइट वर चार्जर TC G1001-US आणि G1000-US मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे तर बॅटरी G025J-B मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केली गेली आहे. फोन बॅटरी रेटिड कॅपेसिटी 3,080एमएएच तर पावर 3,140एमएएच सांगण्यात आली आहे.
तुमच्या लक्षात असेल कि कि हार्डवेयरच्या समस्येमुळे Google Pixel 4 भारतात लॉन्च नव्हता झाला, पण गूगल जगात वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेला सोडू इच्छित नाही. यामुळे कंपनी पिक्सल 4ए इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च करेल. लीक नुसार Google Pixel 4a या फोनची किंमत 399 यूएस डॉलरच्या आसपास म्हणजे जवळपास 29,000 रुपये असेल. कोरोना वायरसमुळे हा फोन बाजारात येण्यास वेळ लागत आहे.
Google Pixel 4a
फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा फोन पिक्सल 3ए प्रमाणेच प्लास्टिक बॉडी वर सादर केला जाईल. रिपोर्टनुसार पिक्सल 4ए पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल आणि या फोन मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5.81 इंचाची ओएलईडी स्क्रीन मिळेल. लीकनुसार हा फोन आक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करेल, सोबतच Google Pixel 4a मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 730 चिपसेट मिळेल. ग्राफिक्ससाठी या गूगल फोन मध्ये ऐड्रेनो 618 जीपीयू असल्याचे समोर आले आहे.
Google Pixel 4a च्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे असेल. फोटोग्राफीसाठी 12.2 मेगापिक्सल सेंसर असलेला रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगण्यात आले आहे जो ओआईएस व आटोफोकस सारख्या फीचर्स सह येईल. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 84 डिग्री फिल्ड व्यू असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार पिक्सल 4ए 6 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच हा फोन 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल.
गूगल पिक्सल 4ए बाबत या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन गूगलच्या टायटन एम सिक्योरिटी चिप सह येईल तसेच या डिवाईस मध्ये हेडफोन जॅक पण दिला जाईल. लीकनुसार Google Pixel 4a को Just Black आणि Barely Blue कलर मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे मागे गूगल पिक्सल 4ए फ्रेंच रिटेलर वेबसाइट वर सोबतच सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर पण लिस्ट करण्यात आला होता.
गूगल पिक्सल 4ए वीडियो












