या पावरफुल प्रोसेसरसह येईल Google Pixel 5A 5G, समोर आली महत्वाची माहिती

Google लवकरच स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवीन दमदार 5जी फोन Google Pixel 5A 5G लॉन्च करण्याची योजना बनवत आहे, ज्याची प्रतीक्षा जगभरातील फॅन्सना आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि गुगलचा हा 5जी फोन लॉन्च केला जाणार नाही, पण अलीकडेच कन्फर्म झाले आहे कि गुगल पिक्सल सीरीजचा हा नवीन फोन Google Pixel 5a 5G यावर्षीच लॉन्च केला जाईल. सध्या कंपनीने या फोनच्या लॉन्च डेटची घोषणा केली नाही, पण बोलले जात आहे कि यावर्षी जुलै किंवा ऑगस्टमध्ये हा फोन भारतासह जगभरात लॉन्च केला जाईल. आता फोनची महत्वाची माहिती एका मीडिया रिपोर्टमध्ये समोर आली आहे. (Google Pixel 5A 5G launch soon with Snapdragon 765G)

पावरफुल प्रोसेसर

टेक वेबसाइट 9to5google च्या बातमीनुसार Pixel 5a 5G मध्ये Snapdragon 765G चिपसेट दिला जाईल. पण हा चिपसेट आता जुना झाला आहे. सध्या मार्केटमधील Xiaomi Mi 11 Lite 5G मध्ये Snapdragon 780G सारखा चिपसेट आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy S20 FE 4G झाला सादर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Google Pixel 5a ची डिजाइन

काही दिवसांपूर्वी Pixel 5a चे काही अधिकृत दिसणारे रेंडर ऑनलाइन लीक झाले होते. रेंडरर्सवरून समजले होते कि फोनमध्ये Pixel 4a सारखी डिजाइन असेल, पण यात डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच Pixel 5a मध्ये कथितरित्या 6.2 इंचाचा फ्लॅट OLED डिस्प्ले असेल आणि यात बॅक पॅनल प्लास्टिकचा असेल.

Google pixel 5

तसेच फ्रंटला सेल्फी कॅमेऱ्यासाठी कटआउट आणि मागे डुअल कॅमेरा सेटअप आहे. प्रोसेसरबाबत यापूर्वी लीक समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले होते कि या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीज चिपसेट दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 6000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्ससह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान

Google I/O 2021

Google च्या वार्षिक डेवलपर इवेंट Google I/O 2021 ची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. हा डेवलपर इवेंट 18 मेपासून सुरु होईल जो 20 मेपर्यंत सुरु राहील. तीन दिवसांचा हा इवेंट ऑनलाइन आयोजित केला जाईल. याआधी कंपनीने गेल्यावर्षी कोरोना वायरस महामारीमुळे Google I/O 2020 रद्द केला होता. Google 2021 इवेंटमध्ये कंपनी आपली अपकमिंग मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम Android 12 जगासमोर ठेवेल. गुगलचा हा इवेंट मोफत बघता येईल. पण यासाठी युजर्सना डेवलपर कॉन्फ्रेंससाठी रजिस्टर करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here