Samsung Galaxy S20 FE 4G झाला सादर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Samsung Galaxy S20 FE 4G स्मार्टफोन कंपनीने अधिकृतपणे जगासमोर आणला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन स्वीडिश वेबसाइटवर लिस्ट केला गेला आहे. सॅमसंगने याआधी Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचा 4G वेरिएंट कंपनीने Qualcomm Snapdragon 865 SoC सह सादर केला आहे. तर 5G वेरिएंट Exynos 990 चिपसेटसह सादर केला गेला आहे. चिपसेटव्यतिरिक्त या स्मार्टफोनची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स सारखे आहेत. सॅमसंगचा हा स्मार्टफोन पंच-होल सेल्फी कॅमेरा, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे. Samsung Galaxy S20 FE 4G स्मार्टफोनचे प्रमुख स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 6.5-इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले, 12MP प्राइमेरी कॅमेरा, Android 11 OS आणि 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. (Samsung Galaxy S20 FE 4G launched with Snapdragon 865 chip check price and specifications)

Samsung Galaxy S20 FE 4G स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S20 FE 4G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा FHD+ Super AMOLED Infinity-O डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आली आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 865 SoC चिपसेटसह सादर केला गेला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Oppo F17 Pro स्मार्टफोन झाला अजून स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये

Samsung S20 FE 4G

Galaxy S20 FE 4G स्मार्टफोनमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित कंपनीच्या कस्टम युआय OneUI वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जला सपोर्ट करते.

हे देखील वाचा : 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Samsung Galaxy S20 FE 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे ज्यात 12MP वाइड अँगल लेंस, 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 8MP टेलीफोटो 3x ऑप्टिकल झूम लेंस देण्यात आली आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटी पाहता सॅमसंगच्या या फोनमध्ये 5G, 4G LTE, डुअल-बॅंड Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, आणि चार्जिंग व डेटा ट्रांसफरसाठी USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि IP68 रेटिंगसह सादर केला गेला आहे.

Samsung Galaxy S20 FE 4G किंमत

Samsung Galaxy S20 FE 4G स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा केला गेला नाही. बोलले जात आहे कि जर्मनीमध्ये सॅमसंगचा हा Snapdragon 865 असलेला हा स्मार्टफोन 630 यूरो (जवळपास 57,100 रुपये) च्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here