HMD XR21 रगेड स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

एचएमडी ग्लोबलने एक नवीन रिब्रँडेड XR21 स्मार्टफोन सादर केला आहे, ज्याला गेल्यावर्षी Nokia ब्रँडिंग अंतर्गत सादर केले होते. हा HMD XR21 रगेड फोनच्या रूपामध्ये युरोपमध्ये लाँच झाला आहे. यात युजर्सना 6.49 ची स्क्रीन, Snapdragon 695 5G चिपसेट, 64MP चा रिअर कॅमेरा सेटअप, पाणी आणि धूळीपासून वाचण्साठी IP68 रेटिंग सारखे अनेक फिचर्स मिळतील. चला, पुढे तुम्हाला फोनची संपूर्ण माहिती देत आहोत.

HMD XR21 चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: HMD XR21 मोबाईलमध्ये युजर्सना 6.49 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळतो यावर 120Hz रिफ्रेश रेट, 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन, 550 निट्स पर्यंत ब्राईटनेस, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्यो आणि सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
  • प्रोसेसर: फोनला चालवण्यासाठी मिळणारा प्रोसेसर पाहता कंपनीने यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट दिली आहे.
  • स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी डिव्हाईसमध्ये युजर्सना 6GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता HMD XR21 स्मार्टफोनला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह एंट्री मिळाली आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: फोनमध्ये जास्त वेळ बॅकअप प्रदान करण्यासाठी कंपनीने 4800mAh च्या मोठ्या बॅटरीचा वापर केला आहे याला फास्ट चार्ज करण्यासाठी 33वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
  • इतर: फिचर्स पाहता HMD XR21 मध्ये युजर्सना ड्युअल स्पिकर, फेस अनलॉक फीचर, फिंगरप्रिंट सेन्सर, IP68/69 रेटिंग सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
  • कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी युजर्सना ड्युअल सिम, 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाईप सपोर्ट देण्यात आला आहे.
  • ओएस: स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉईड 13 वर आधारित आहे. त्याचबरोबर युजर्सना 2 वर्षाचे ओएस अपग्रेड पण मिळेल.

HMD XR21 ची किंमत

  • HMD XR21 सिंगल स्टोरेज ऑप्शन 6GB रॅम + 128GB स्टोरेजमध्ये आला आहे. याची किंमत 599.99 यूरो म्हणजे जवळपास 54,215 रुपये आहे.
  • कलर ऑप्शन पाहता डिव्हाईस फक्त एक मिडनाईट ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here