Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G 15 मार्चला येऊ शकतात बाजारात; टिपस्टरनी दिली माहिती

Highlights

  • Samsung Galaxy A34 5G मध्ये 48MP चा कॅमेरा मिळू शकतो.
  • दोन्ही फोन्समध्ये 5000mAh ची बॅटरी मिळू शकते.
  • या हँडसेटमधील प्रोसेसर वेगवेगळे असू शकतात.

Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G बद्दलच्या चर्चा गेले कित्येक दिवस टेक विश्वात सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही या स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील लीक केले होते. आता बातमी आली आहे की सॅमसंग ए सीरीजचे हे आगामी स्मार्टफोन याच महिन्यात बाजारात येईल. एका टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G स्मार्टफोन येत्या 15 मार्चला ग्राहकांच्या भेटीला येतील.

Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G लाँच

प्रसिद्ध टिपस्टर OnLeaks नं माहिती दिली आहे की Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G स्मार्टफोन मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 15 मार्च, 2023 ला लाँच केले जातील. आतापर्यंत कंपनीनं या हँडसेट च्या लाँच डेटबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु आज आलेली बातमी खरी ठरल्यास लवकरच सॅमसंग हे स्मार्टफोन टीज करण्यास सुरु करू शकते. हे देखील वाचा: भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची जबरदस्त रेंज

Samsung Galaxy A54 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.4″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Samsung Exynos 1380 SoC
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 25W 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी 54 स्मार्टफोन 2340 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होईल जो सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन कंपनीच्या एक्सनॉस 1380 प्रोसेसरवर काम करू शकतो तसेच मार्केटमध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB च्या दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A54 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो, जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो/बोका लेन्स असू शकते. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए54 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करू शकतो. हा फोन आयपी67 रेटेड असू शकतो. अँड्रॉइड आधारित वनयुआय 5 सोबतच Galaxy A54 मध्ये ड्युअल सिम, एनएफसी, ओटीजी आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळू शकतात.

Samsung Galaxy A34 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 1080 SoC
  • 48MP Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 25W 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए34 मध्ये कंपनी 2340 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.6 इंचाचा लार्ज फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फोनचे डायमेंशन 161.3 x 78.1 x 8.2एमएम आणि वजन 199ग्राम असेल. हा वॉटरप्रूफ मोबाइल देखील आयपी67 सर्टिफाइड असू शकतो, जो 1 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे सुरक्षित राहू शकतो.

Samsung Galaxy A34 अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5 वर सादर केला जाईल जो मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर काम करू शकतो. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: पैसे तयार ठेवा! पुढील आठवड्यात येतोय Realme C55; अत्यंत कमी किंमतीत शानदार फिचर

फोटोग्राफीसाठी या सॅमसंग फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो/बोका लेन्स दिली जाऊ शकते. Samsung Galaxy A34 13 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here