Jio, Vi की Airtel कोण देतंय 296 रुपयांमध्ये जास्त फायदे; 30 दिवसांच्या वैधतेसाठी कोणाची करावी निवड

Highlights

  • Vodafone-Idea नं आपला नवीन 296 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे.
  • Vodafone-Idea 195 रुपये आणि 319 रुपयांच्या प्लॅन्समध्ये देखील 1 महिना व्हॅलिडिटी देते.
  • Airtel आणि Jio कडे देखील 296 रुपयांचा प्लॅन आहे.

Vodafone-Idea आपल्या प्रीपेड सेगमेंटमध्ये अनेक बदल करत आहे. एयरटेलनं आपला महसूल वाढवण्यासाठी स्वस्त प्लॅन्स बंद केल्यापासून वोडाफोन आयडिया देखील आपली रणनीती बदलत आहे. कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी 30 दिवसांची वैधता असलेला नवा प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत 296 रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे जियो आणि एयरटेलकडे देखील 296 रुपयांचा प्लॅन आहे, आज आपण या तिन्ही कंपन्यांच्या या प्लॅन्सची तुलना करणार आहोत. सर्वप्रथम वोडाफोन आयडियाच्या 296 रुपयांच्या प्लॅनची माहिती घेऊ.

Vodafone-Idea Rs 296 Plan

वोडाफोन आयडियाच्या 296 रुपयांच्या प्लॅनमध्ये 25जीबी डेटा आणि 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. त्याचबरोबर कंपनी ग्राहकांना अमर्याद कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील देत आहे. हा हिरो अनलिमिटेड प्लॅन नसल्यामुळे बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हर, अतिरिक्त डेटा आणि ओटीटी बेनिफिट्स मिळत नाही. फक्त ग्राहक वी म्युजिक आणि टीव्ही अ‍ॅप अ‍ॅक्सेस मोफत मिळेल. हे देखील वाचा: पैसे तयार ठेवा! पुढील आठवड्यात येतोय Realme C55; अत्यंत कमी किंमतीत शानदार फिचर

Reliance Jio Rs 296 Plan

296 रुपयांच्या प्लॅनमध्ये जियो देखील 25जीबी डेटा देत आहे. तसेच या प्लॅनमध्ये देखील अमर्याद कॉलिंग आणि रोज 100 मोफत एसएमएस 30 दिवसांसाठी मिळतील. त्याचबरोबर ग्राहकांना JioCinema, JioSecurity आणि JioTV या कंपनीच्या अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जात आहे.

Reliance Jio Adds Over 29 Lakh Mobile Subscribers Before Ambani 5G Service

Airtel Rs 296 Plan

एयरटेलच्या 296 रुपयांच्या प्लॅनमधील बेसिक बेनिफिट्स सारखेच आहेत. हा प्लॅन देखील 25जीबी डेटा 30 दिवसांसाठी देतो. त्याचबरोबर कंपनी अमर्याद कॉलिंग आणि रोज 100 मेसेज मोफत देत आहे. यातील एक्सट्रा बेनिफिट्स पाहता, ग्राहकांना 100 रुपयांच्या फास्टटॅग कॅशबॅक, विंक म्युजिक, अपोलो 24/7 सर्कल्स, आणि 30 दिवसांसाठी मोफत हॅलो ट्यून दिली जात आहे. हे देखील वाचा: याच महिन्यात येतील Samsung चे दोन 5G Phone; Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G विषयी महत्वाची माहिती समजली

कोणाचा प्लॅन आहे बेस्ट

तिन्ही टेलिकॉम कंपन्या सामान किंमतीत सामान वैधतेसाठी 25जीबी डेटा देत आहेत. परंतु अतिरिक्त बेनिफिट्स देण्याच्या बाबतीत एयरटेल आणि जियोनं बाजी मारली आहे. एयरटेल कॅशबॅक, हॅलो ट्यून आणि विंक म्युजिकचं सब्सस्क्रिप्शन देत आहे. तर जियो आपल्या अनेक अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देत आहे.

महत्वाची बाब म्हणजे वोडाफोन आयडिया 4जी सर्व्हिस देत आहे. दुसरीकडे एयरटेल आणि जियो त्याच प्लॅनमध्ये 5जी वापरू देत आहे. यामुळे एयरटेल आणि जियोनं नक्कीच हा राउंड जिंकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here