कालच आम्ही ऑनर संबंधित एक बातमी पब्लिश केली होती, ज्यात सांगितले होते कि कंपनी Honor 20 आणि Honor 20 Pro नावाचे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. मागे हे दोन्ही स्मार्टफोन यूरोपच्या सर्टिफिकेशन्स साइट ईईसी वर लिस्ट झाले होते तसेच काल चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबोच्या एका पोस्ट मध्ये या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला होता. आज ऑनरच्या या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोन ऑनर 20 लाइट ची माहिती पण समोर आली आहे. एक लीक मध्ये फक्त ऑनर 20 लाइट चा फोटो शेयर केला गेला नाही तर फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा करण्यात आला आहे.
Honor 20 Lite बद्दल विनफ्यूच ने एक रिपोर्ट पब्लिश केला आहे ज्यात फोनच्या फोटो सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सची पण माहिती देण्यात आली आहे. फोटो वरून समजले आहे कि ऑनर 20 लाइट पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोन बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. Honor 20 Lite च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. वाल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजविकडे आहेत.
ऑनर 20 लाइट स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार Honor 20 Lite 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.21-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वर सादर केला जाऊ शकतो जो 415पीपीआई ला सपोर्ट करेल. रिपोर्ट नुसार ऑनर 20 लाइट एंडरॉयड 9 पाई आधारित हुआवई ईएमयूआई वर सादर केला जाईल तसेच हा फोन 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या हाईसिलिकॉन किरीन 710 चिपसेट वर चालेल.
हे देखील वाचा: जबरदस्त कॅमेरा आणि 8जीबी रॅम सह हुआवई पी30 प्रो आला भारतात, या फोनने घेतलेल्या फोटोला नाही तोड
Honor 20 Lite या लीक मध्ये 4जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीक नुसार Honor 20 Lite ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळू शकतो. तसेच फोन मध्ये 120 डिग्री अल्ट्रा वाइड एंगलला सपोर्ट करणारा 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो.
हे देखील वाचा: 6जीबी रॅम सह हुआवई पी30 लाइट झाला भारतात लॉन्च
लीकनुसार सेल्फी साठी Honor 20 Lite एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो फोनच्या वॉटरड्रॉप नॉच मध्ये असेल. ऑनर 20 लाइट चा कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजी सह येईल. लीक नुसार Honor 20 Lite डुअल वाईफाई व ब्लूटूथ 4.2 सह येईल तसेच फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण दिला जाईल. हा एक रियल डुअल सिम फोन असेल जो 4जी ला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देखने मिळू शकते.
Honor 20 Lite बद्दल या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन येत्या 25 एप्रिलला टेक मंचावर येईल.















